'जादूटोण्याने तुझा कोंबडा बनवू', धमकी देत 3 भोंदूबाबानी लाखांना लुटले  Saam Tv
महाराष्ट्र

'जादूटोण्याने तुझा कोंबडा बनवू', धमकी देत 3 भोंदूबाबानी लाखांना लुटले

 घरांवर असलेली सापाची सावली दूर करू आणि घरात असलेले गुप्त धन काढून देऊ अशी बतावणी करून औरंगाबाद शहरातील एका व्यापाऱ्याला ३ भोंदूबाबांनी १० लाखांना फसवले

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : घरांवर असलेली सापाची सावली दूर करू आणि घरात असलेले गुप्त धन काढून देऊ अशी बतावणी करून औरंगाबाद शहरातील एका व्यापाऱ्याला ३ भोंदूबाबांनी १० लाखांना फसवले आहे. इतकेच नाही तर १० लाख रुपये घेतल्याचे कुणाला सांगितले तर तुझा कोंबडा करू, अशी धमकी देखील त्याला दिली आहे. १० लाख रुपये गेले आणि आता कोंबडा व्हावं लागेल या भीतीने व्यापाऱ्याने पोलीस ठाणे गाठले आहे.

घरावर असलेली सापाची सावली दूर करण्यासाठी आणि घरात असलेले गुप्तधन मिळवण्याच्या लालसेपोटी औरंगाबादच्या एका व्यापाऱ्याला १० लाखांचा गंडा बसला आहे. १० लाख रुपये दिल्यानंतर गुप्तधन तर मिळाले नाही. हे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने मांत्रिकाला जाब विचारला आहे. मात्र, जादूटोण्याने तुझा कोंबडा बनवू अशी मांत्रिकाने धमकी दिल्यानंतर व्यापारी हादरून गेला आणि अखेर पोलीस ठाणे गाठले आहे.

हे देखील पहा-

औरंगाबाद शहरातील एका कापड व्यापाऱ्याच्या घरात सतत वाद होत असल्यामुळे त्याच्या एका मित्राने मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्या व्यापाऱ्याने मांत्रिकाची भेट घेतली. त्यावेळी भोंदूबाबा असलेल्या ३ मांत्रिकानी घेऊन तुझ्या घरावर सापाची सावली आहे, तुझ्या घरावर कोणीतरी करणी केली आहे आणि तुझ्या घरात गुप्तधन असल्यामुळे तुला सुख मिळत नाही, अशी बतावणी केली.

त्यासाठी परभणीवरून एक मांत्रिक येईल आणि तुझ्या घरात सुख शांती लाभेल आणि गुप्त धन ही काढून देईल, त्याला १० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर १० लाख रुपये दिल्यानंतर व्यापाराच्या घरात पूजा करण्यात आली होती. त्यामध्ये कुठलेही गुप्तधन मिळाले नाही. गुप्तधन निघाले नसल्याने व्यापाऱ्याने पैसै परत मागितले तर या बाबांनीच त्याला धमकी द्यायला सुरुवात केली.

पैशांची वारंवार मागणी केली आणि कुणाला सांगितल्यात मला अघोरी विद्या येते, त्यातून तुला कोंबडा बनवणार अशी धमकी भोंदूबाबाने दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठले आहे. त्या ३ बाबांनी यापूर्वी काही लोकांना फसवल असल्याचे पोलिसांच्या तपासात दिसून आले आहे. ते तिन्ही भोंदू बाबा सध्या फरार आहेत. अंधश्रद्धा कायद्यानव्ये गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू आहे.

मात्र, लाखोंचे व्यवहार करणारा शिक्षित व्यापारी भोंदूबाबाचा जाळ्यात अडकला कसा? असा प्रश्न पोलिसांनाही देखील पडला आहे. त्यामुळे आता हे ३ भोंदुबाबा ज्यावेळेस पोलिसांच्या ताब्यात येतील. त्यावेळी मात्र, पोलीस त्यांना कोंबडा करून आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगायला लावतील, हे मात्र नक्की आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Marathi bhasha Vijay Live Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे; मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

SCROLL FOR NEXT