Winter Session 2021: 10 जण कोरोना पॉझिटिव्ह ! Saam Tv
महाराष्ट्र

Winter Session 2021: 10 जण कोरोना पॉझिटिव्ह !

महाराष्ट्रात आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्याचवेळी अधिवेशनापूर्वी झालेल्या RTPCR चाचणीत 8 पोलिसांसह 10 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर : महाराष्ट्रात आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) आजपासून सुरू होत आहे. त्याचवेळी अधिवेशनापूर्वी झालेल्या RTPCR चाचणीत 8 पोलिसांसह 10 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यासोबतच 2 विधिमंडळातील कर्मचाऱ्यांचाही कोरोनाची लागण झाली आहे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सुमारे 3500 लोकांची चाचणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगचा (Genome Sequencing) निर्णय घेणे बाकी आहे.

तर, मंगळवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 825 नवीन रुग्ण आढळून आले, त्यात ओमिक्रॉनच्या 11 रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय 14 जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यातील एकूण बाधितांची संख्या ६६ लाख ५० हजार ९६५ झाली आहे. मृतांचा आकडा एक लाख ४१ हजार ३६७ वर पोहोचला आहे. अशा स्थितीत, सोमवारी राज्यात संसर्गाची 544 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, परंतु ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही. याशिवाय ४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. जे 1 एप्रिल 2020 नंतर सर्वात कमी होते.

महाराष्ट्रात ओमिक्रॉन वाढतोय;

महाराष्ट्रात Omicron चे 11 नवीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी 8 लोक मुंबईतील आहेत. अशाप्रकारे, महाराष्ट्रात ओमिक्रॉन बाधितांची एकूण संख्या आता 65 झाली आहे. मुंबईत ओमिक्रॉन बाधितांची एकूण संख्या 30 वर पोहोचली आहे. मात्र, अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या कोरोना टास्क फोर्सने फेब्रुवारी महिन्यात ओमिक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. टास्क फोर्सच्या मते, फेब्रुवारी महिन्यात, ओमिक्रॉन संसर्गाच्या संख्येत अचानक वाढ होईल. अशा परिस्थितीत, Omicron थांबवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आहे असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fried Modak Recipe : खुसखुशीत तळणीचे मोदक कसे बनवाल? वाचा परफेक्ट सारण बनवण्याची रेसिपी

Bollywood Celebrity Ganpati 2025 : सलमान खान ते रितेश देशमुख; बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरचा गणराया, पाहा PHOTOS

Russia-Ukraine War: रशिया- युक्रेन युद्धात युरोपीय देशांची एन्ट्री; युद्ध आणखी भडकणार?

Maharashtra Live News Update: नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू

Manoj Jarange Morcha: मनोज जरांगेंच्या मोर्चाचा दुसरा दिवस, किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन मुंबईकडे निघणार; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT