Ajit pawar
Ajit pawar  Saam TV
महाराष्ट्र

Ajit Pawar: 'म्हणून सरकारच्या चहापानावर बहिष्कार...', अजित पवारांनी स्पष्टचं सांगितले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Winter Assembly Session : उद्यापासून राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरमध्ये सुरू होणार होत आहे. या अधिवेशनाची संपूर्ण तयारी पुर्ण झाली आहे. अधिवेशनाच्या पुर्व संधेला सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षनेत्यांना चहापानाचे आमंत्रण दिले होते. ज्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल खुलासा केला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंधेला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. ज्यामध्ये त्यांनी अधिवेशनासह अनेक विषयांवर संवाद साधला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी "आम्ही अधिवेशनाआधी बैठक घेतली. मात्र राज्यात ग्रामपंचायत निवडणुका असल्याने अनेक नेते उपस्थित नव्हते" असा खुलासा केला.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, "एकनाथराव शिंदे यांनी विरोधकांना चहापानाला बोलवले होते. पण आम्ही चर्चा केली. सहा महिने सत्तेत आलेले हे सरकार अपेक्षा पूर्ण करु शकले नाही. सरकारमधील नेत्यांकडून महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणे सुरूच आहे. राज्यातील प्रकल्प गुजरातला गेले. सीमाप्रश्न, शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नाही. या सर्वांवर आम्ही विचार केला आणि चहापानावर बहिष्कार टाकला."

यावेळी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महामोर्चावर केलेल्या टिकेलाही उत्तर दिले. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "त्यांनी नाकाखालून सरकार नेले म्हणत नाकाचा उल्लेख केला हे दुर्देव आहे. आता सगळ्यांची नाकं तपासावी लागतील. याआधी तेच हा एकनाथ शिंदेंचा अंतर्गत वाद असल्याचे सांगत होते. नंतर बदला असल्याचे सांगितले आणि आता ते नाकाखालून घेतल्याचे सांगतात. मुळात कशाखालून घेतले हा संशोधनाचा भाग आहे."

यावेळी अजित पवार यांनी समृद्धी महामार्गाविषयी बोलताना त्याचे आम्ही उद्घाटन करणार होतो. मात्र त्याआधी नाकाखालून सरकार गेले अशी कोपरखळीही लगावली. यावेळी राज्य सरकारवर टिका करताना त्यांनी हे स्थगिती सरकार असून आमच्या कामांना स्थगिती देत असल्याचा आरोपही केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT