Uddhav Thackeray’s Legislative Council membership faces uncertainty as MVA allies debate seat sharing ahead of the upcoming election. Saam Tv
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंची आमदारकी धोक्यात? राजकीय वर्तुळात खळबळ

Eknath Shinde Camp Targets Uddhav Thackeray: आता विधानपरिषद निवडणुकीत ठाकरेंची आमदारकी पणाला लागणार आहे... मात्र उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवर टांगती तलवार असल्याची चर्चा का आहे? ठाकरेंच्या आमदारकीबाबत शिंदेसेनेनं काय टोला लगावलाय...? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

Bharat Mohalkar

शरद पवारांना राज्यसभेवर पाठवल्यानं राज्यसभेचा तिढा सुटला... मात्र आता विधानपरिषदेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे....कारण 13 मे रोजी उद्धव ठाकरेंच्या आमदारकीची टर्म संपतेय... मात्र उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेवर जावं, अशी इच्छा राऊतांनी व्यक्त केलीय..

मात्र राऊतांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या नावाला थेट पाठिंबा न देता काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं सावध प्रतिक्रिया दिलीय... खरं तर महाविकास आघाडीला राज्यसभेची एकच जागा जिंकणं शक्य होतं.. या जागेसाठी महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांनी फिल्डिंग लावली होती...याच काळात ठाकरेसेनेनं सातत्यानं संख्याबळ आणि मविआतील चक्राकार सुत्राचा दाखला देत राज्यसभेवर दावा केला.... एवढंच नाही तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी तर राज्यसभा काँग्रेसला आणि विधानपरिषद ठाकरेसेनेला देण्याविषयी तयारी दाखवली... मात्र राज्यसभा पवारांनी पटकावली... आता विधानपरिषदेवरुन पेच निर्माण होऊ शकतो....

13 मे 2026 ला उद्धव ठाकरेंसह 9 जागा रिक्त होत आहेत... त्यामुळे एका जागेसाठी 32 पहिल्या पसंतीच्या मतांची आवश्यकता आहे..सध्या महायुतीकडे 235 आमदार आहेत... त्यामुळे 7 आमदार निवडून येऊ शकतात.. तर महाविकास आघाडीकडे 50 आमदार आहेत... त्यामुळे 1 जागा सहज निवडून येऊ शकते... आता महायुतीचे 11, मविआचे 18 आणि एमआयएम आणि अपक्षांचे 3 मतं शिल्लक राहतात... 1 जागेसाठी युती आणि आघाडीकडे पुरेसं संख्याबळ नाही.. त्यामुळे फोडाफोडी होण्याची शक्यता आहे...

आता महाविकास आघाडीत रस्सीखेच रंगल्यानं ठाकरेंचं टेन्शन वाढलंय... आणि शिंदेसेनेनं ठाकरेंना डिवचण्याची संधी साधली... काँग्रेसनं विधानपरिषदेसाठी दावा ठोकला तर ठाकरेंचं टेन्शन वाढू शकतं.. त्यामुळे ठाकरेंना काँग्रेस नेत्यांची मनधरणी करण्यात यश मिळणार का? की भाजपच उद्धव ठाकरेंना मदत करणार यावर उद्धव ठाकरेंची आमदारकी राहणार की जाणार, हे स्पष्ट होणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

SCROLL FOR NEXT