Udayanraje Bhosale  SaamTV
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale: छत्रपती शिवरायांचे विचार खऱ्या अर्थाने PM नरेंद्र मोदींनीच आचरणात आणले : उदयनराजे भोसले

ओंकार कदम

Satara News :

भाजप नेत्यांच्या गराड्यात आज (गुरुवार) खासदार उदयनराजे भाेसले (mp udayanraje bhosale) यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी (pm narendra modi) यांच्या कार्याची स्तुती करत सातारा लोकसभा मतदारसंघात (satara lok sabha constituency) निवडणुक (loksabha election 2024) लढविणार आहात का या प्रश्नाला मात्र बगल दिली. राजेंनी आजचा दिवस त्याबाबत बाेलण्याचा नसल्याचे सांगत ज्यावेळेसचे त्यावेळेला बघू असे स्पष्ट केले. (udayanraje bhosale latest news)

श्री अयोध्या (ayodhya ram mandir) येथून अभिमंत्रित होऊन आलेला मंगल अक्षता कलशाचे आज (गुरुवार) जलमंदिर पॅलेस (jalmandir palace) येथील श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित हाेते. (Maharashtra News)

उदयनराजे म्हणाले हिंदू हा धर्म नसून जगण्याचा मार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांनी सर्व धर्म समभाव ही संकलपना रुजवली, आचरणात आणली. त्यांनी कधीही दुसऱ्या धर्माचा भेदभाव केला नाही.

आज मात्र जातीजातीत भेदभाव निर्माण केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे जर खऱ्या अर्थाने कोणी आचरणात आणले असतील तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी असेही उदयनराजेंनी नमूद केले.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT