विधानसभा अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडून दोन अनपेक्षित नावे येणार ? saam tv
महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडून दोन अनपेक्षित नावे येणार ?

शरद पवार यांनी काँग्रेस जो उमेदवार देईल त्याला महाविकास आघाडीने सहमंती दर्शवावी असे म्हटले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रामनाथ दवणे

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Assembly Speaker Election) काँग्रेसकडून (कॉंग्रेस) काही अनपेक्षित नावांचाही विचार होण्याची शक्यता आहे. आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte), आमदार सुरेश वरपूडकर (Suresh varpudkar) आणि आमदार अमीन पटेल (Amin patel) यांची नावे चर्चेत आहेत. तर अनुभवी चेहरा देण्याचा विचार काँग्रेसने केल्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former Chief Minister Prithviraj Chavan) यांचं नावंही काँग्रेसकडून (Congress) पुढे आणलं जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या वाट्याला असलेलं विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची नावे पुढे आहेत.

महाविकास आघाडीतील शिवसेनेनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती असल्याची माहीती समोर आली आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने पृथ्वीराज चव्हाण आणि संग्राम थोपटे यांच्या नावाला नकार दिला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री पदावर असताना जलसंपदा विभागाची चौकशी लावली गेली यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय संग्राम थोपटे यांनी लोकसभा निवडणूकीच्या वेळी भाजप सोबत बांधणी करत राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न केला होता, याचा राग राष्ट्रवादीला आहे. मागील वेळी झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात संग्राम थोपटे यांचे मंत्रिपद राष्ट्रवादीमुळेच गेल्याचे बोलले जाते. याचा राग आणत संग्राम थोपटे यांनी भोरमधील काँग्रेसचे कार्यालय फोडले होते.

नाना पटोले हे मंत्रिपदासाठी इच्छुक असले तरी सध्याच्या स्थितीत मंत्रिमंडळात एकही पद रिक्त नाही. उर्जामंत्री नितीन राऊत यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगून त्यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवण्यासाठी पटोले हे प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. राऊत यांनी या बदलासाठी नकार दिल्यास मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाचा राजीनामा देऊन या पदासाठी तयार केलं जाईल, अशीही चर्चा आहे. दरम्यान शरद पवार यांनी काँग्रेस जो उमेदवार देईल त्याला महाविकास आघाडीने सहमंती दर्शवावी असे म्हटले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: दिंडोरीमधून अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ होणार आमदार? पाहा Exit Poll

Dahisar Exit Poll : दहिसर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? घोसळकर भाजपला धक्का देणार का?

President's Rule : 26 तारखेला राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागेल का? अनंत कळसेंनी काय सांगितलं, पाहा VIDEO!

Kankavli Exit Poll: राणेंच्या वर्चस्वाला सुरुंग लागणार का? कणकवलीचा एक्झिट पोल काय सांगतो?

Maharashtra Exit Poll : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभेवर जाणार का? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?

SCROLL FOR NEXT