Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

आणखी २ वर्षांचा काळ, शिवसैनिकांची नाराजी दूर करू; शिंदे गटातील खासदाराचं वक्तव्य

'राजकीय कौशल्य न वापरल्याने अडीच वर्षात आम्हाला उद्धवजींनी वेळ दिला नाही.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मोबिन खान -

शिर्डी / अहमदनगर: शिर्डी लोकसभेचे शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे (MP Sadashiv Lokhande) तब्बल महिन्याभरानंतर दिल्लीहून त्यांच्या शिर्डी मतदारसंघात दाखल झाले. बंडखोरी केल्यानंतर मतदारसंघात शिवसैनिकांकडून लोखंडेंच्या विरोधात मोठा रोष पहायला मिळाला.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेत शिवसैनिकांनी (Shivsainik) बंडखोर खासदार लोखंडे यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला तर मतदारसंघात फिरू देणार नसल्याचा इशारा देखील दिला होता.

याच पार्श्वभुमीवर लोखंडे यांनी भाजप (BJP) कार्यकर्त्यांच्या गराडयात शिर्डी विमानतळ ते शासकीय विश्रामगृह गाठले आणि पत्रकार परिषद घेऊन आपल्या निवासस्थानी गेले. शिंदे गटात गेल्याने कार्यकर्ते माझ्यावर नाराज असतील मात्र दोन वर्षाचा काळ असल्याने विकास कामांसह नाराज कार्यकर्त्यांनी आणलेली कामे करून नाराजी दूर करू असा आशावाद लोखंडे यांनी व्यक्त केला.

पाहा व्हिडीओ -

यावेळी बोलतना ते म्हणाले, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना १५ खासदार भेटलो. शिवसेनेचे खासदार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून आले. गेल्या अडीच वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची देखील कामे झाली मात्र, आम्हाला केंद्राचा निधी मिळाला नाही आणि राज्याची साथ मिळाली नाही.

सतत उद्धवजींकडे (Uddhav Thackeray) पाठपुरावा करत होतो मात्र त्यांना प्रशासनाचा अनुभव नसल्याने ते कारण असू शकते. २०१४ आणि २०१९ ला मला संधी दिली. सर्व मित्र पक्षांनी महायुतीच्या माध्यमातुन मी निवडून आलो. राजकीय कौशल्य न वापरल्याने अडीच वर्षात आम्हाला उद्धवजींनी वेळ दिला नाही. कोविडचा काळ होता मात्र, कॉग्रेस आणि राष्ट्रवादीची कामे होत होती ती व्यथा खासदारांनी उद्धवजींकडे मांडली.

आघाडी विरोधात लढलो, अडीच वर्षात कामे झाली नाहीत. आमचं म्हणनं होत दोन पावलं मागे येऊन भाजपसोबत तह करा अशी भुमिका खासदारांनी मांडली. नगरविकास खात्याच्या माध्यमातुन एकनाथ शिंदे यांनी भरीव निधी दिला. आम्ही काही सत्तेच ताम्रपट घेऊन जन्माला आलो नाही.जी संधी मिळाली तीच सोन करण्याचा माझा प्रयत्न असल्याचं ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, संवाद यात्रेतील भाषणादरम्यान आदित्य ठाकरे यांनी लोखंडेवर नाराज असताना २०१९ साली जनेतेची माफी मागून त्यांना निवडून आणलं असल्याचं वक्तव्य केल होत त्यावर लोखंडे म्हणाले, मी जर एवढाच नालायक असतो तर मला जनतेने मतं दिली नसती. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी दिली त्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली. त्यांनी देखील माझ्यासाठी मते मागितली , मी नाही म्हणत नाही असंही लोखंडे यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT