will rani nilesh lanke contest in parner vidhansabha election
will rani nilesh lanke contest in parner vidhansabha election Saam Digital
महाराष्ट्र

चर्चाच चर्चा! खासदार निलेश लंकेंच्या पत्नी विधानसभा निवडणूक लढणार?

Siddharth Latkar

- सुशील थोरात

अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. निलेश लंके खासदार झाल्याने अनेक तालुक्यातील विधानसभेची गणिते देखील बदलली आहेत. पारनेर तालुक्यात विधानसभेसाठी निलेश लंके यांच्या पत्नी आणि माजी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली आणि अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. यामध्येच संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची चुरशीची लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी जिंकली आहे. या निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव करत सामान्य घरातील माणूसही खासदार होऊ शकतो हे दाखवून दिले. निलेश लंके यांच्या पत्नी राणी त्यांच्या बरोबरच राजकारणात आहेत. त्या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.

आता राणी लंके यांचे नाव पारनेर विधानसभेसाठी पुढं येऊ लागले आहे. याबाबत साम टीव्हीशी बाेलताना राणी लंके म्हणाल्या लोकसभा निवडणुकीसाठी जसा उत्साह होता तसाच उत्साह आता विधानसभेसाठी नागरिकांचा दिसून येत आहे. सध्या खासदारांना अनेक कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यांना काय हवं काय नकाे हे पाहत असल्याचे राणी लंके यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News | सोलापुरात चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्रमाचा मंडप उडाला!

Nanded Breaking News : टिप्परच्या धडकेत रिक्षाचा चुराडा; एक ठार, ७ गंभीर जखमी, ५ मुक्या प्राण्यांचाही गेला जीव

Marathi Live News Updates : रविकांत तुपकरांनी फुंकलं विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग; बुलडाण्यात ६ जागांवर स्वतंत्र उमेदवार

Ashadhi Ekadashi 2024 : विठ्ठलाला तुळशीहार का वाहतात?

Termeric Water Benefits: पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या झटपट वजन कमी करा

SCROLL FOR NEXT