Pankaja Munde News Saam tv
महाराष्ट्र

Pankaja Munde: ५ वर्षांचा वनवास खूप झाला, पंकजा मुंडेंकडून लोकसभा लढवण्याचे संकेत; कार्यकर्त्यांना भावनिक साद

Beed Politics News: ५ वर्षाचा वनवास खूप झाला, की अजून पाहिजे तुम्हाला? या कलियुगाच्या राजकारणाच्या रनामध्ये माझ्या पाठीमागे तुमचे बळ उभे करा. अशी भावनिक साद कार्यकर्त्यांना घालत पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.

विनोद जिरे

Pankaja Munde Lok Sabha Election News

५ वर्षाचा वनवास खूप झाला, की अजून पाहिजे तुम्हाला? या कलियुगाच्या राजकारणाच्या रनामध्ये माझ्या पाठीमागे तुमचे बळ उभे करा. मला वचन द्या तुम्ही साथ देणार, अशी भावनिक साद कार्यकर्त्यांना घालत पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. त्या बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील मानूर येथे बोलत होत्या. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या हस्ते (रविवारी) शिरूर कासार तालुक्यातील मानूर येथे गोपीनाथ गडाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी पंकजा म्हणाले, की "एखाद्याला फ्रॅक्चर झालं तर त्याला फोन करणे माझ्याकडून राहून जात असेल".

"पण समाजासाठी निर्णय घेताना लाखो लोकांचे भले होणार असेल, तर तेव्हा तुमची ताई मागेपुढे अजिबात पाहत नाही. कुणालाही शरण जात नाही, कधी झुकत नाही, चुकत नाही, आणि रुकत नाही. मग तुम्ही माझ्यासोबत राहणार की नाही?"

आता एवढे दिवस वनवास भोगलाय. पूर्वी १४ वर्षाचा वनवास होता, मात्र ५ वर्षाचा वनवास खूप झाला, की असून पाहिजे तुम्हाला?", असा भावनिक सवाल पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना विचारला. (Latest Marathi News)

"या कलियुगाच्या राजकारणाच्या रनामध्ये माझ्या पाठीमागे तुमचे बळ उभे करा, मला वचन द्या, तुम्ही साथ देणार." असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा लोकसभा उमेदवारीचे संकेत दिले.

"हाताच्या मुठी वळून वचन द्या, आपली स्वाभिमानाची लढाई कधीच आपण सोडायची नाही. मी जशी रणामध्ये उतरले तसं तुम्ही पण रनामध्ये उतरायचं. या कलियुगाच्या राजकारणाच्या रणामध्ये माझ्या पाठीमागे तुमच्या आशीर्वादाचे बळ उभे करा. तुमची मान खाली जाईल असं काम मी अजिबात करणार नाही आणि कुणालाही करू देणार नाही"

"मी तुम्हाला वचन देते,की मी थकणार नाही, रूकणार नाही आणि कोणासमोर कधीही झुकणार नाही. मी उतणार नाही आणि मातणार नाही, मी घेतला वसा सोडणार नाही", असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT