Agriculture Minister Maanikrao Kokate caught on camera playing rummy during assembly session political controversy escalates. Saam Tv
महाराष्ट्र

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Minister Playing Rummy: विधीमंडळात मोबाईलवर रमी खेळणे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवर चांगलंच शेकलंय. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केलीये. तर दुसरीकडे कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याचे संकेत राष्ट्रवदीचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी दिलेत.

Omkar Sonawane

मंत्रिपद मिळाल्यापासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकणारे कृषिमंत्र्यांचा पाय आणखी खोलात गेलाय... राज्यात शेतकरी संकटात असताना सभागृहात जंगली रमी खेळणं कृषिमंत्री कोकाटेंवर चांगलंच शेकण्याची शक्यता आहे... कारण रमीबाज कोकाटेंची हकालपट्टीचे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिलेत.

खरंतर पावसाळी अधिवेशनात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडीओ रोहित पवारांनी ट्वीट केला. त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले... अजित पवारांनी कोकाटेंच्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली... तर त्यानंतर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय...

शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील वक्तव्यांनी कोकाटे यापूर्वीच वादात अडकले आहेत. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनीही त्यांना समज दिली होती. शेतकरी विरोधी वक्तव्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता असल्यानेच डॅमेज कंट्रोलसाठी कोकाटेंना नारळ दिला जाणार का? याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडमधील ध्वजारोहण आदित्य तटकरेंच्या हस्ते होणार

Nashik News: शिंदे गटाच्या बैठकीत तुफान राडा, पदाधिकाऱ्यांची कॉलर पकडत शिवीगाळ; पाहा VIDEO

INDIA Alliance Protest: विरोधकांच्या मोर्चादरम्यान महिला खासदार बॅरिगेट्सवर चढल्या, घोषणाबाजी करताना दोघी चक्कर येऊन पडल्या

Radhakrishna Vikhe Patil : केवळ आरोप करून आरक्षण मिळणार आहे का? मंत्री विखे पाटील यांचा जरांगे पाटील यांना सवाल

Dashavatara: बाप-मुलाच्या धमाल नात्याची झलक 'आवशीचो घो'मध्ये; 'दशावतार'मधील पहिलं गाणं प्रदर्शित

SCROLL FOR NEXT