मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बाबत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना विधानसभेत दाखल केली होती. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, याबाबत आमदार शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच 100 साक्षीदारांची साक्ष नोंदवून ही घेण्यात आली असून पोलीस पुढील कार्यवाही करीत असल्याचे सांगितले.
हे देखील पहा :
याचवेळी भाजपा आमदार मनिषा चौधरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांचे नाव न घेता त्यांनी भाजपाच्या महिलांबाबत केलेल्या त्रविधानावरुन त्यांच्यावर कारवाई का होत नाही ? याकडे सरकारचे लक्ष वेधले. भाजपा नगरसेविका शितल गंभीर यांनी मरिन लाईन पोलीस ठाण्यात त्या खासदारांविरोधात (खा.संजय राऊत) यांच्या विरोधात 9 डिसेंबरला तक्रार केली असून त्यावरुन गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल भाजपाकडून (BJP) विचारण्यात आला.
तसेच भाजपा आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी भाजपा नगरसेविकांंचा स्थायी समितीच्या सभागृहाबाहेर करण्यात आलेला विनय भंग आणि त्याबाबत पोलीसांनी न केलेल्या कारवाई बाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना गृहमंत्र्यांनी (Dilip Walse-Patil) सांगितले की, खासदारांनी महिलांचा अवमान करणारे केलेल्या वक्तव्याबाबत दिल्लीत गुन्हा दाखल झाला असून मरिन लाईन पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आहे. पोलीस याबाबत चौकशी करुन पुढील कार्यवाही लवकरात लवकर करतील, असेही त्यांनी सांगितले. तर नगरसेविका विनयभंग प्रकरणी ही चौकशी करण्यात येईल असेही गृहमंत्री म्हणाले.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.