Eurasian Sparrowhawk migratory bird sighting at Bor Dam  saam tv
महाराष्ट्र

हजारो किलोमीटरचा प्रवास करून आला हिवाळी पाहुणा! बोर धरणावर दुर्मिळ ‘युरेशियन स्पॅरोहॉक’चे आगमन

Eurasian Sparrowhawk Spotted at Bor Dam : बोर धरणावर युरोप आणि रशियातील सायबेरियातून आलेल्या दुर्मिळ स्थलांतरित हिवाळी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. निसर्गप्रेमी आणि पक्षी अभ्यासकांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरली आहे.

Saam Tv

विदर्भाच्या जैवविविधतेत आणखी एका दुर्मिळ आणि देखण्या शिकारी पक्ष्याची भर पडली आहे. युरोप, रशिया आणि सायबेरियातील कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करत ‘युरेशियन स्पॅरोहॉक’ हा दुर्मिळ स्थलांतरित पक्षी अमरावतीतील बोर धरण परिसरात दाखल झाला आहे. नोव्हेंबर २०२६ मध्ये या पक्ष्याचे दर्शन घडल्याने पक्षीप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

अमरावतीचे प्रसिद्ध वन्यजीव व पक्षी छायाचित्रकार, नॅशनल जिओग्राफिक पुरस्कार विजेते तसेच होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. तुषार अंबाडकर यांनी या दुर्मिळ पक्ष्याची छायाचित्रांसह नोंद केली आहे. त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या या पक्ष्यामुळे अमरावतीच्या पक्षीवैविध्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

४ ते ६ हजार किलोमीटरचा प्रवास

युरेशियन स्पॅरोहॉक हा प्रामुख्याने युरोप, रशिया आणि सायबेरियातील थंड प्रदेशांतील जंगलांमध्ये आढळणारा शिकारी पक्षी आहे. हिवाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. परिणामी अन्नाची उपलब्धता कमी होत असल्याने हा पक्षी उबदार प्रदेशांच्या दिशेने स्थलांतर करतो. या प्रवासात मध्य आशियासह हिमालयीन प्रदेश ओलांडून तो भारतात पोहोचतो. सायबेरिया आणि रशियातून मध्य भारतापर्यंतचा त्याचा प्रवास अंदाजे चार ते सहा हजार किलोमीटरचा असल्याचे सांगितले जाते.

पक्षीप्रेमींसाठी दुर्मिळ पर्वणी

युरेशियन स्पॅरोहॉक हा आकाराने लहान असला तरी अत्यंत चपळ शिकारी पक्षी म्हणून ओळखला जातो. लहान पक्ष्यांची शिकार करण्यात तो तरबेज आहे. बोर धरण परिसरात या पक्ष्याची नोंद होणे ही अमरावतीच्या जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब मानली जात आहे. या दुर्मिळ हिवाळी पाहुण्याच्या आगमनामुळे पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी हा परिसर आकर्षणाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! कापसाच्या शेतात गांजाची शेती; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Skin Care : तरूण तुर्क...चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांना करा 'बाय-बाय'! नितळ आणि टवटवीत त्वचेसाठी ५ रामबाण उपाय

या फोटोमध्ये एकूण किती पक्षी लपलेले आहेत?

बाईक-चारचाकीवर जात लिहिणाऱ्यांची आता खैर नाही; वाहनांबाबत 'या' राज्य सरकारचा मोठा निर्णय

तुला पाहावं की सूर्यफुलाला?

SCROLL FOR NEXT