Maharashtra Winter session Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Winter Session: हिवाळी अधिवेशनाचा धुरळा नागपुरातचं का उडतो? पाहा काय आहे इतिहास

अधिवेशनासाठी राज्य भरातील नेते मंडळी नागपुरात तळ ठोकून आहेत. मात्र राज्याचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरातचं का होते? काय आहे यामागचे कारण असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nagpur: राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू असून विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. या अधिवेशनासाठी राज्य भरातील नेते मंडळी नागपुरात तळ ठोकून आहेत. मात्र राज्याचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरातचं का होते? काय आहे यामागचे कारण असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. जाणून घेवूया नागपुरात हिवाळी अधिवेशन होण्याचा निर्णय का घेण्यात आला? काय होते यामागील खास कारण, आणि इतिहास.

राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरातच (Nagpur) होते, यामागे बराच इतिहास आहे. सन 1854 पासून ते 1956 पर्यंत म्हणजेच तब्बल 102 वर्ष नागपूर ही ब्रिटिश कालीन नागपूर प्रांताची राजधानी होती. 1953 च्या डिसेंबरमध्ये केंद्र सरकारच्या जस्टिज फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली या देशातील पहिले राज्य पुन:रचना आयोग प्रस्थापित केले गेले.

याचकाळात महाराष्ट्रातील नेत्यांना सोबत घेत विदर्भातील नेत्यांशी चर्चा करण्यात आली आणि 28 सप्टेंबर 1953 रोजी नागपुरात 11 पाणी करार करण्यात आला. या करारात एक अधिवेशन नागपुरात घेणे, लोकसंख्येप्रमाणे सरकारी नोकऱ्या देण्यात येतील, शिक्षण संस्थेमध्ये जागा राखीव ठेवण्यात येतील, उत्पन्नाच्या आधारे निधी खर्च केला जाईल असे काही मुद्दे नमूद केले होते. या करारानंतर 1 नोव्हेंबर 1956 रोजी सी.पी अँड बेरार मधून विदर्भ वेगळा करण्यात आला. 30 ऑक्टोबर 1956 पर्यंत नागपूर शहर नागपूर प्रांताची राजधानीचे शहर होते.

1953चा करार

फजल अली आयोगाकडून 1956मध्ये आलेल्या अहवालानुसार, विदर्भ आणि विदर्भातील आठ जिल्ह्यांना सी.पी अँड बेरार मधून वेगळं करण्यात आले. 10 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या विधानसभेत राज्यपालांचा संदेश वाचून दाखवण्यात आला. त्यात असे म्हटले होते की, आज पासून विधानसभा बरखास्त करण्यात आली आहे. 1953 मध्ये जो करार होता त्या करारानुसार नागपूरला राजधानीचा दर्जा गमवावा लागला.

या करारानंतर राजधानीचा दर्जा गमावल्याची सल कायम राहू नये म्हणून वर्षातील एक अधिवेशन नागपुरला घेण्याचा ठराव करण्यात आला. 1953 साली हा कायदा करण्यात आला. याच कायद्यानुसार 1960 चे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले हिवाळी अधिवेशन (Winter Session) नागपुरमध्ये पार पडले. तेव्हापासून राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरमध्ये पार पडते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT