माझ्या पतीवर गुन्हा का दाखल केला? नवनीत राणा कडाडल्या! SaamTvNews
महाराष्ट्र

माझ्या पतीवर गुन्हा का दाखल केला? नवनीत राणा कडाडल्या!

शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी अमरावतीमध्ये मनपा आयुक्त आष्टीकर यांच्यावर शाई फेक प्रकरण चांगलंच गाजतेय. या प्रकरणी आ.रवी राणा यांच्यावर केस दाखल करण्यात आली होती.

अरुण जोशी

अमरावती : शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी अमरावतीमध्ये मनपा आयुक्त आष्टीकर यांच्यावर शाई फेक प्रकरण चांगलंच गाजतेय. या प्रकरणी अमरावतीचे (Amravati) आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर देखील केस दाखल करण्यात आली होती. त्या संदर्भात आज नवनीत राणा पोलीस आयुक्त यांच्याशी भेट घेणार होत्या. मात्र, पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी भेट नाकारली. अमरावतीमध्ये आमदार रवी राणा नसताना देखील त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याचे उत्तर द्यावे, असा सवाल खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केलाय.

हे देखील पहा :

त्या म्हणाल्या, सत्ता तुमची आहे. तुम्हाला जर आम्हाला अटक करायची असेल तर करा. आम्ही पोलीस ठाण्यामध्ये जायला तयार आहोत. नवनीत राणा यांनी आरोप केला की, पालकमंत्र्यांच्या दबावामुळे आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतत पालकमंत्र्यांचे फोन सुरू असल्याने आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

आधी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर नवनीत राणा या महापालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांच्या बंगल्यावर पोहचल्या मात्र आयुक्तांनी भेट नाकारल्याने राणा परतल्या व अमरावती कर जनतेचा अपमान त्यांनी केला असल्याचे त्या यावेळी म्हणाल्यात. पोलिसांवर मुंबईवरून अमरावतीत दबाव देण्यात आला. म्हणूनच पोलिसांनी आमदार रवी राणा गुन्हा दाखल केला. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना फसवा असे पन्नास फोन अमरावतीच्या पालकमंत्र्यांनी पोलिसांना केले.

खासदार नवनीत राणा या मनपा आयुक्तयांच्या घरासमोर गेल्या. मनपा आयुक्त यांच्या घराचे गेट बंद होते. गेट जवळील सिक्युरिटी गार्ड त्यांना आतमध्ये जाऊ देण्यास मज्जाव केला. मी आयुक्तांचे सांत्वन करण्यासाठी आली होती. पण, मला न भेटून त्यांना मी प्रतिनिधीत्व करीत असलेल्या लोकांचा अपमान केला, असं नवनीत राणा यावेळी म्हणाल्या. त्यानंतर खासदार राणा यांनी आपला मोर्चा थेट राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये वळविला तिथेही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. नवनीत राणा या पोलिसांकडून शाईफेकीची माहिती घेतली.

मनपा आयुक्तांनी भेट नाकारल्यानंतर राणा या थेट राजापेठ पोलीस ठाण्यात पोहचल्या.त्या ठिकाणी जवळपास दोन तास त्यांनी पोलीस उपयुक्त विक्रम साळी यांच्या सोबत चर्चा केली मात्र जे आरोपी अटकेत आहेत त्यांच्या सोबत पोलिसांनी नवनीत राणा यांची भेट नाकारली. युवा स्वाभिमान आणि आमदार रवी राणा यांच्यावर जे गुन्हे लावण्यात आले ते गुन्हे मुख्यमंत्री व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या दबावात रात्री उशिरा दाखल करण्यात आल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

मनपा आयुक्तांनी खोटी तक्रार देऊन पोलीस आयुक्तांनी देखील त्या तक्रारीची शहनिशा न करता हत्येचा प्रयत्न केल्याचे गंभीर गुन्हे दाखल केले. आपण मनपा आयुक्त व पोलीस आयुक्त या दोघांचीही केंद्राकडे तक्रार करून चौकशी लावणार असल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

SCROLL FOR NEXT