Maharashtra Politics: 
महाराष्ट्र

Ajit Pawar: अजित पवार कॅबिनेट मिटिंगमधून बाहेर का पडले? खुद्द पवारांनी सांगितलं नेमकं कारण

Maharashtra Politics: महायुतीमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांदरम्यान अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

Bharat Jadhav

अजित पवार हे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. वाई विधानसभेच्या उमेदवारीवरुन शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये वाद होत आहे. शिंदे गटाच्या नेत्याकडून टीका होतेय. त्याचदरम्यान अजित पवार हे चालू मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाहेर पडले. यावरून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना अधिकच पेव फुटले. मात्र या सर्व घटनांवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत बैठकीतून का बाहेर पडलो?याचे नेमकं कारण त्यांनी सांगितलंय.

अजित पवार हे मंत्रिमंडळाच्या बैठकीतून निघून गेले होते. आजही महायुतीच्या कार्यक्रमाला जातांना जळगाव विमानतळावरून माघारी फिरत मुंबई गाठली. यावरून अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान यापार्श्वभूमीवर अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार की, उमेदवार घोषित करणार याचा उलगडा होणार आहे. याआधी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण बैठकीतून बाहेर का पडलो याचे कारण त्यांनी सांगितलंय.

नाराज नाही

राज्य मंत्रिमंडळात बैठकीत शिवसेना आणि तुमच्या मते नाराजी झाली. पण असं काहीही झालेलं नाही. चॅनलला काहीतरी दाखवायचं असतं म्हणून ते दाखवतात. काल माझा कार्यक्रम अहमदपूर लातूर जिल्ह्यामध्ये होता. काही कारणाने कॅबिनेट उशीर झाला आणि मला विमानाने जायचं होतं त्यामुळे मला जाणे गरजेचे होते, त्यामुळे मी तिथून निघालो. तिथे शेतकरी मेळावा असल्यामुळे तिथे मला अर्जंट जावे लागले, अजित पवार म्हणालेत.

अमळनेर दौरा का केला रद्द

शेतकऱ्यांकरता महिलांकरता जनसामान्य करता सरकारने ज्या योजना राबवलेल्या आहेत त्यांची माहिती आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहोत. योजना यशस्वी व्हायला लागला तर विरोधकांनी टीका केली. लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून ते चक्क कोर्टात गेले. पण कोर्टाने त्यांना काय सांगायचे ते सांगितलं. अमळनेर दौराविषयी बोलतांना अजित पवार म्हणाले, अमळनेरला मोठा पाऊस पडला तर दुसरीकडे मला यायला सुद्धा उशीर झाला. त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही.

मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार वाद आहे का?

सं काही नाही तुम्हाला पत्रकारांना काही माहीत नसतं. 24 तास चॅनलला काही ना काही बातम्या दाखवत असतात, त्यामुळे काही वेगळ्या बातमी या सोडल्या जातात. काही कारणास्तव कॅबिनेट उशिरा सुरू झाले मला एक वाजता मला एका कार्यक्रमाला जाणं गरजेचं होतं. त्यामुळे मी अकरा ते 12:30 मी थांबलो आणि विमान पकडायचं होतं म्हणून मी निघून गेलो. नांदेड आणि अहमदपूर या ठिकाणी कार्यक्रम होते. कालच्या दुःखद घटना मुळे अत्यंत साधेपणाने हे कार्यक्रम पार पडले, त्यानंतर पुन्हा मी मुंबईमध्ये आलो, अशी वस्तुस्थिती आहे.

वाचळाविरांना आवरा

इतरांची काय वक्तव्य आहेत, याबद्दल मी आमच्या महायुतीच्या नेत्यांना सांगितलं. कोणी वाचाळ वीर जर वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करत असेल तर त्याला थांबवण्याचा काम करावं. अशी वक्तव्य राष्ट्रवादीची करत असतील तर आम्ही थांबवू शिंदे साहेबांचे लोक करत असतील तर शिंदे साहेबांनी थांबावं आणि भाजपचे करत असतील तर भाजपचे फडणवीस साहेबांनी किंवा बावनकुळे खुळे साहेबांनी आवर घालावा, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT