नांदेड हिंसाचाराचा कट बऱ्याच दिवसांपासून शिजत होता?  - Saam Tv
महाराष्ट्र

नांदेड हिंसाचाराचा कट बऱ्याच दिवसांपासून शिजत होता?; यात कोणाचा हात?

१२ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी नांदेडात रझा अकादमीसह १२ ते १५ मुस्लिम संघटनांनी बंदचं आवाहन केलं होतं.

डॉ. माधव सावरगावे

नांदेडमध्ये अचानक उसळलेल्या हिंसाचाराचा कट बऱ्याच दिवसांपासून शिजत होता का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी अशा घटनेची पेरणी केली गेली होती, का याचाही आता तपास सुरू आहे. रझा अकादमीकडून बंदची हाक, मोर्चा त्यानंतर हिंसाचार आणि पुन्हा प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून लगेच आंदोलनाची हाक, ही आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलीय.

१२ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी नांदेडात रझा अकादमीसह १२ ते १५ मुस्लिम संघटनांनी बंदचं आवाहन केलं होतं. शहरातील मुस्लिमबहुल भागात सकाळी कडकडीत बंद होते. त्याच काळात देगलूर नाका येथे मुस्लिमांनी निषेध सभा घेतली. त्याठिकाणी भाषणे झाली. दुपारनंतर निषेध सभेसाठी जमलेल्या जमावाने देगलूर नाका, शिवाजीनगर, कलामंदिर, पावडेवाडी नाक्यासह अनेक ठिकाणी दगडफेक केली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी वाहने, दुकान, वाईनमार्ट, स्वीटमार्ट काही दुकानांची तोडफोड करीत दहशत निर्माण केली.

नांदेडात रझा अकादमीकडून बंदची हाक दिल्यानंतर मोठा जमाव रस्त्यावर उतरला होता. मात्र, पोलिसही अनभिज्ञ असल्यासारखी स्थिती होती. इतक्या मोठ्या संख्येने अचानक जमलेल्या जमवासमोर मोजक्या पोलिसांचा बंदोबस्त होता. ज्यावेळी तोडफोड आणि जाळपोळ झाली, त्यावेळी पोलीस पोहचले. रझा अकादमीच्या या बंदच्या आवाहनाला मुस्लिम समाजातील जवळपास १२ ते १५ संघटनांनी पाठिंबा दिला होता. नांदेडातल्या भागात मोठ्या संख्येने मुस्लिम लोक जमले होते. त्यामुळे या बंद, सभा आणि तोडफोडीचा कट अगोदरच शिजला होता, असा अंदाज आहे. कारण अत्यंत व्यवस्थितपणे सोशल मीडियाचा वापर करून इतकी गर्दी जमवल्याचं हळूहळू समोर येतंय.

याप्रकरणी चारशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ५० आरोपींना अटक केली. यातील १० जण गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले लोक आहेत. रजा अकादमीच्या आयोजकावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. व्यासपीठावरुन प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई केली जाणार आहे. हे इतकं झाल्यानंतर लगेच भाजपकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली. त्यासाठी १६ नोव्हेंबर रोजी भाजपकडून आंदोलन करण्याबाबत परवानगी मागण्यात आली. मात्र, पोलिसांनी नाकारले. कोणतीही कल्पना नसताना अचानक उसळलेल्या हिंसाचारामुळं आणि लगेच भाजपने आंदोलनासाठी हालचाली सुरू केल्याने रझा अकादमी आणि भाजपनेच षडयंत्र घडवून आणले का? याचीही आता चौकशी होण्याची शक्यता आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतांची जुळणी करण्यासाठी आतापासूनच हालचाली सुरू झाल्यात का यावर चर्चा सुरू झाली आहे. मुस्लिम संघटना आणि राजकीय पक्षांशी संबंधित लोकांची भूमिका संशयास्पद दिसू लागली आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे. येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अधिक यश मिळेल म्हणून असा प्रयत्न केला जातोय का, याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यात हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजात तेढ निर्माण करून कोणीतरी आपली पोळी भाजेल अशी भीती राज्यातील जनतेला वाटू लागली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajgira Laddu Recipe : नवरात्रीत उपवासाला खा टेस्टी राजगिरा लाडू; प्रोटीनसह मिळेल दिवसभराची एनर्जी, रेसिपी १० मिनिटांत तयार

Maharashtra News Live Update: मंगळवेढ्यात दुष्काळाची दाहकता; आमदार समाधान आवताडेंकडून नुकसानग्रस्त गावांची पाहणी

Blood vessel health: प्लाक जमा होऊन रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यात? या 5 ड्रिंक्सने लगेच वितळेल चरबी

Bollywood Actor Arrested: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

FASTag New Update : फास्टॅगच्या नियमामध्ये मोठा बदल! 'या' वाहनधारकांना ५ वर्षांपर्यंत टेन्शन नाही, वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT