Gunaratna Sadavarte On Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Who Is Jarange: ‘हू इज जरांगे’, गुणरत्न सदावर्ते संतापले; पाहा VIDEO

साम टिव्ही ब्युरो

>> रामू ढाकणे

Gunaratna Sadavarte On Manoj Jarange Patil:

''हू इज जरांगे, जरांगे पाटील दादा झाले आहेत का?'', असं वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना सदावर्ते हे मनोज जरांगे पाटील यांच्यावर संतापले.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत की, ''आम्ही राज्यपालांना विनंती केली की, सरकारने मराठा आरक्षणाबाबत बिल पास केले. त्यावर राज्यपालांनी सही करू नये, आम्ही आक्षेप नोंदवले आहेत. सर्वेक्षण चुकीचे झाले आहेत. त्याआधारे होणार कायदा योग्य नाही, आमचं ऐकत नाही, तोपर्यंत कायद्यावर सही करू नये, अशी आमची मागणी आहे. जर कायद्यावर सही झाली तर, आम्ही याचिका दाखल करू हे नक्की. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले, ''हे आरक्षण टिकणारे नाही. हे न्यायालयात टेस्ट होईल असे निवृत्त न्यायाधीश म्हणतात. ज्या समितीमध्ये दिलीप भोसले निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यावर भोसले यांच्याकडे उत्तर नव्हते. याचा अर्थ ते सामाजिक मागास नाही. विनाकारण कुणी त्यांना मागास ठरवू नये. उगाच मागास ठरवून मराठा समाजाच्या अपमान आहे.''  (Latest Marathi News)

सदावर्ते पुढे म्हणाले, ''शरद पवार राजकारण करतात त्यांनी जरांगे यांना फुगवले आहे. ते संविधान विशेषद्य नाही. 2014 मध्ये त्यांनी आरक्षण दिले ते कुठं टिकले त्याहीवेळी आम्ही होतो. मराठा बांधवाना चुकीच्या मार्गाने जरांगे यांनी नेऊ नये. जरांगे यांनी त्यांचे नैराश्य इथं काढू नये. ज्या पोलिसांवर अंतरवलीत हल्ला झाला त्या पोलिसांना राष्ट्रपती पदक द्यायला हवे, असंही ते म्हणाले.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना ते म्हणाले की, ''जरांगे हे काय दादा झाले आहेत काय. यापूर्वीही सुद्धा बेकायदेशीरपणे वर्तन करून मुंबईमध्ये येऊन धुडगूस घालू आणि मुंबईला वेठीस धरू त्यावेळी मीच होतो. कायद्याचा उल्लंघन करून वेशीमध्ये घुसता येत नाही. हे मीच दाखवून दिलेलं आहे. 149 ची जी नोटीस निघाली ती गुणरत्न सदावर्ते यांच्या याचीकेवरच निघालेली आहे आणि त्याची माहिती गुणरत्न सदावर्ते तिला पोलीस आणि न्यायालयाने सुद्धा दिलेली आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT