Who Is Aanvi kamdar Saam Tv
महाराष्ट्र

Who Is Aanvi kamdar: रिल्सच्या नादात जीव गमावलेली अन्वी कामदार कोण आहे? ३०० फूट खोल दरीत कशी काय पडली, नेमकं काय घडलं?

Reel Star Aavni Kamdar Viral Video: मुंबईतील रिल स्टार अन्वी कामदारचा दरीत कोसळून मृत्यू झालाय. रायगडच्या माणगावमधील कुंभे धबधब्यावरील ही घटना आहे. नेहमी पर्यटनस्थळांची माहिती देणारी अनं लाखो फॉलोअर्स असलेली तन्वीचा पावसाळी पर्यटनातच दरीत कोसळून मृत्यू झालाय.

Girish Nikam

सध्याचा जमाना रिल्सचा आहे, सेल्फीचा आहे. सोशल मीडियावरील लाईक्सचा आहे. रिल्ससाठी अनेक जण जीव धोक्यात घालतात. उत्साहाच्या भरात धोकादायक ठिकाणी जातात. त्यामुळे राज्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अनेकांचा जीव गेलाय. नुकतीच संभाजीनगरमध्ये रिल्स बनवण्याच्या नादात दरीत कार कोसळून तरुणीचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये रिल्स स्टारला आपला जीव गमावावा लागला.

मुंबईची अन्वी कामदार ही सहा मित्र-मैत्रिणींसोबत माणगाव येथील कुंभे धबधब्यावर गेली होती. तिथेच रिल शूट करताना तिचा तोल जाऊन ती थेट 300 फूट खोल दरीत कोसळली. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला.

नेमकी घटना कशी घडली?

अन्वी ही जेव्हा कुंभे धबधब्यावर पोहोचली आणि तिथे रिल्स शूट करू लागली. याचवेळी या उंच पठारावर तुफान पाऊस सुरू होता. जिथे अत्यंत चिंचोळ्या वाटेवरून जात अन्वीने त्याचं टोक गाठलं. संपूर्ण निसरड्या झालेल्या या वाटेवर उभं राहून अन्वी रिल्स शूट करत होती. पण त्याचवेळी अचानक तिचा तोल गेला आणि ती थेट 300 फूट खोल दरीत कोसळली.

बचाव पथकान अन्वीला सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर दरीतून वरती आणलं. बचाव पथक जेव्हा खाली पोहचलं तेव्हा अन्वीची काहीशी हालचाल सुरू होती. मात्र, उपचाराअभावी तिचा मृत्यू झाला.

कोण आहे अन्वी कामदार?

अन्वी कामदार ही प्रसिद्ध 'रील स्टार'आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आहे. 27 वर्षांची अन्वी मुंबईतील माटुंग्याची रहिवासी आहे. अन्वी कामदार व्यवसायाने सीए आहे. जगभर फिरून अनेक ट्रॅव्हल व्हिडीओ तयार केले. प्रेक्षणीय स्थळं, हॉटेल्स, समुद्र किनारे दाखविण्यासाठी रिल्स टी बनावट होती. इन्स्टाग्रामवर तूच अडीच लाख फॉलोअर्स आहेत. theglocaljournl या नावानं तिचे इन्स्टाग्राम अकाउंट आहे.

जवळपास २८०० पोस्ट आणि रील्समधून तन्वीन प्रेक्षकांसाठी देश-विदेशातील पर्यटनाचं जणू एक दालनच खुलं केलं होतं. मृत्यूच्या केवळ एक दिवस आधी म्हणजे १५ जुलैला तिने एक व्हिडिओ शेअर केला होता. पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी पाच पर्यटन स्थळांची माहिती तिने त्यात दिली होती.

यात उदयपूर, कर्नाटक, गोवा, दिल्ली-आग्रा, भंडारदरा, शिलाँग अशी काही स्थळं तिने सुचवली होती. तरुणांमध्ये सोशल मीडियावर रील्स बनवण्याची क्रेझ इतकी आहे की ते जोखीम पत्करायला मागेपुढे पाहत नाहीत. मात्र त्यामुळे अनेक वेळा अपघात होतात आणि जीवही जातो. निसर्गाचा आनंद घ्या...मात्र रिल्सच्या नादात रियल लाईफ धोक्यात घालू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT