कोण अजित पवार? मी त्यांना ओळखत नाही - नारायण राणे Saam Tv
महाराष्ट्र

कोण अजित पवार? मी त्यांना ओळखत नाही - नारायण राणे

भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आदित्य ठाकरेंकडे (Aditya Thackeray) बघत म्याव म्याव असा मांजरीचा आवाज काढला या त्यांच्या आवाजावरून राज्यातले राजकारण चांगलेच तापले.

संभाजी थोरात, कोल्हापूर

संभाजी थोरात

कोल्हापूर : भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आदित्य ठाकरेंकडे (Aditya Thackeray) बघत म्याव म्याव असा मांजरीचा आवाज काढला या त्यांच्या आवाजावरून राज्यातले राजकारण चांगलेच तापले. विधानभवन परिसरात अशा प्रकारे आमदारांनी वर्तन करू नये, आपण कुत्री, मांजरींचे प्रतिनिधित्व करत नाही हे लक्षात ठेवावे, असा सूचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणेंना लगावला. त्यावर नितेश राणेंचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पत्रकार परिषदेत बोलत असताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी आज विधानसभेत बोलताना मांडलेल्या भूमिकेवर त्यांनी टीका केली आहे.

"अजित पवार यांना मी ओळखत नाही"

संतोप परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नितेश राणे यांच्यावर आरोप झाले आहेत त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. नारायण राणे यांनी यावेळी बोलतना अजित पवार (Ajit Pawar) यांनीही लक्ष केले आहे. अजित पवार यांनी नुकतेचं म्याव म्याव आवाज काढण्यावरुन नितेश राणे यांना नाव न घेता टोला लगावला होता, त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले कोण अजित पवार यांना मी ओळखत नाही. ज्या अजित पवारांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार केली त्यांच्याबद्दल काय विचारता असे म्हणत राणेंनी अजित पवारांना लक्ष केले आहे.

हे देखील पहा-

आदित्य ठाकरे मांजराचा संबंध?

मांजराचा आवाज काढल्याने एवढं चिडायला काय झालं? आदित्य ठाकरेंचा आणि मांजराचा काही संबंध आहे का? वाघाची मांजर कधी झाली? आदित्य ठाकरे जात असताना कुणी म्याव म्याव केलं असेल तर आदित्य ठाकरेंचा आवाज तसा आहे का? ते तसं बोलतात का? असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार ₹३०००; सरकारने उचललं मोठं पाऊल

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Municipal Election : प्रचार संपण्याआधीच भाजपला जोरदार धक्का, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार नाही? कारण आलं समोर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT