Udayanraje on First Girls School  Saam Tv News
महाराष्ट्र

मुलींच्या पहिल्या शाळेवरुन वाद पेटला? 'पहिली शाळा फुलेंची नाही प्रतापसिंह राजेंची', उदयनराजेंच्या वक्तव्याने नवा वाद

Udayanraje on First Girls School : मुलींची पहिली शाळा ही महात्मा फुलेंनी नाही तर थोरल्या प्रतापसिंह राजेंनी सुरु केली, असं आम्ही म्हणत नाही. तर उदयनराजेंनी म्हटलंय.

Prashant Patil

सातारा : महात्मा फुलेंच्या जयंतीच्या दिवशीच उदयनराजेंनी नव्या वादाला तोंड फोडलंय. महात्मा फुलेंनी १ जानेवारी १८४८ मध्ये सुरु केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेवरच उदयनराजेंनी आक्षेप घेतलाय. तर मुलींची पहिली शाळा महात्मा फुल्यांनी नाही तर थोरल्या प्रतापसिंह राजेंनी सुरु केली आणि फुलेंनी त्यांचं अनुकरण केल्याचा दावा उदयनराजेंनी केलाय.

उदयनराजेंच्या वक्तव्याचा ओबीसी आंदोलक मंगेश ससाणेंनी चांगलाच समाचार घेतलाय. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उदयनराजेंकडून खोटा इतिहास पसरवण्याचं काम सुरु असल्याची टीका केलीय.

उदयनराजेंनी उल्लेख केलेले थोरले प्रतापसिंह राजे कोण होते?

कोण आहेत थोरले प्रतापसिंह भोसले?

1808-1818

मराठा साम्राज्याचे अखेरचे छत्रपती

1818

पराभवानंतर इंग्रजांशी तह करुन साराऱ्याचे राजे म्हणून कार्यरत

1839

बंडखोरीच्या आरोपामुळे इंग्रजांनी गादीवरुन हटवलं

1847

प्रतापसिंह राजेंचं साताऱ्यात निधन

प्रतापसिंह राजेंनी समाजोपयोगी कामं केल्याचाही उल्लेख

उदयनराजेंनी महात्मा फुले वाड्यात जाऊन फुलेंना वंदन केलं. त्यानंतर त्यांनी नवा वाद ओढवून घेतलाय. मात्र महात्मा फुलेंच्या जयंतीच्या दिवशीच उदयनराजेंना ही उपरती झाली का? उदयनराजेंनी केलेल्या वक्तव्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. हे असं असलं तरी इतिहासाची मढी उकरुन हाती केवळ मातीच राहील, हे राजकीय नेत्यांनी लक्षात ठेवायला हवं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : खासगी शिकवणीचा स्लॅब कोसळला; 5 जणांची प्रकृती गंभीर

होळीच्या तोंडावर आदिवासींचे मनरेगाचे पैसे थकले; यशोमती ठाकूरांचे सरकारवर जोरदार टिकास्त्र

Agniveer Recruitment 2026: अग्निवीर होण्याचं स्वप्न होणार पूर्ण, २५००० पेक्षा अधिक पदांसाठी भरती; कुठे अन् कसा करायचा अर्ज?

Gavar-Bhopla Bhaji Recipes : कोकण स्पेशल गवार-भोपळ्याची भाजी अन् गरमागरम तांदळाची भाकरी, रात्रीच्या जेवणाचा गावरान बेत

Oily Skin Makeup Tip: ऑयली स्किनमुळे मेकअप लवकर खराब होतो? मग ट्राय करा ही सोपी मेकअप टिप

SCROLL FOR NEXT