Bachchu Kadu On Sharad Pawar
Bachchu Kadu On Sharad Pawar Saam TV
महाराष्ट्र

कौतुक करताना पवारांचा निशाणा कुठे असतो हे सांगता येत नाही - बच्चू कडू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे -

अमरावती : अपक्ष आमदरांना बदनाम करून चालत नाही मोठ्या पक्षाने सुद्धा नियोजन चुकले, अपक्ष आमदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेला (Shivsena) सपोर्ट करणार होते त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं ते ठेवल्या गेलं नाही. तसंच मोठ्या नेत्यांच पाठबळ असल्याशिवाय ते अपक्ष आमदार फुटले नसल्याचं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.

तसंच शरद पवारांनी (Sharad Pawar) देवेंद्र फडणवीसांचा जे कौतुक केलं त्यात कौतुक करण्यासारखा प्रकार त्याठिकाणी झालेला नाही, पवारसाहेब जेव्हा कौतुक करतात तेव्हा त्यांचा निशाणा कुठे असतो हे सांगता येत नाही. त्यांना वेगळ्या पद्धतीने समोर जायचे असेल असा अंदाजही आमदार बच्चू कडू यांनी लावला.

काय म्हणाले होते पवार ?

शरद पवार यांनी राज्यसभेच्या निकालावर भाष्य करताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं कौतुक केलं ते म्हणाले, 'सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपला यश आले. त्यामुळे हा निकाल लागला. हा चमत्कार मला मान्य करावा लागेल, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विविध मार्गाने या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश आले असल्याचं पवार म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते पुढे म्हणाले, 'संजय राऊतांनी जे आरोप केले त्यात तथ्य असेलच ते शोधले पाहिजे, या निवडणुकीत सगळ्यांनी आपआपलं पाहण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हा पराभव झाला' असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांनी काल अपक्ष आमदारांचा घोडेबाजार झाला म्हणत त्यांनी अपक्ष आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत गद्दारी केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सर्वच अपक्ष आमदारांचा अपमान केला आहे. शिवाय आपण पहिल्यापासून महाविकास आघाडीसोबत आहोत त्यामुळे आमच्यावर केलेला आरोप म्हणजे सर्वच अपक्ष आमदारांचा अपमान असून सर्व अपक्षांच्या भावना व्यक्त करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांची मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेणार असल्याचं अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितलं आहे.

हे देखील पाहा -

तसंच संजय राऊत यांचा चुकतंय, ते खूप मोठे नेते आहे मात्र असा आरोप करणे योग्य नाही. मी पहिल्या पसंतीचा मत संजय पवार व दुसऱ्या पसंतीचा मत संजय राऊत यांना दिलं. मात्र, शिवसेनेचं नियोजन चुकलं, शिवसेनेचे उमेदवार मला फक्त हॉटेलमध्ये भेटले. एक फोन सुद्धा केलेला नाही. मला अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी ज्या सूचना केल्या तर त्या प्रमाणे मतदान केलं' असल्याचं देखील भुयार यांनी सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT