Nana Patekar , Karad, SGM College, Caste & Religion. saam tv
महाराष्ट्र

Nana Patekar : ...तर ते समाजातील सर्वांत माेठे गुंड : नाना पाटेकर (पाहा व्हिडीओ)

अभिनेते नाना पाटेकर हे नुकतेच कराड येथील एका कार्यक्रमासाठी आले हाेते. त्यावेळी युवकांशी त्यांनी संवाद साधला.

साम न्यूज नेटवर्क

Nana Patekar : ‘तुम्हाला कुणी जात-पात, धर्मात अडकवलं तर ते समाजातील सर्वात मोठा गुंड आहे. प्रत्येक जातीने, समाजाने आपल्या धर्माला पुढे नेण्याचे काम केले आहे. जाेपर्यंत तुमच्या मनातून जात ही गाेष्ट जात नाही ताेपर्यंत तुम्ही गुन्हेगार ठरता असं परखड मत अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी कराड येथे विद्यार्थ्यांच्या एका प्रश्नावर व्यक्त केले. (Nana Patekar Latest Marathi News)

कराड येथील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्याने जात धर्माविषयी विचारलेल्या प्रश्नावर नाना म्हणालं आपण आपलं काम करत राहायचं आहे. जे प्रश्न आपल्या मनात येत विचारत राहायचं. त्यांना जन माणसाचे प्रश्न समजातात. सरकारनं (government) याची अंमलबजावणी करावी. आता गंमत म्हणजे ही टीम (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) तीन महिन्यांपूर्वी आली आहे. त्यांना थोडा अवधी देऊ या. शेवटी त्यांना वेळ देण्याशिवाय आपल्याकडं काय आहे.

‘मी कधीही जात-धर्म पाळणार नाही. शब्द पाळा, पण जात-धर्म पलीकडे घरात ठेवा. हे ज्या दिवशी तुम्ही हे कराल हे त्यादिवशी फार साेपं जाईल पुढे जाण्यासाठी. मी तुझ्यापेक्षा लहान किंवा मोठा ही गाेष्ट जाेपर्यंत तुमच्या मनातून जात नाही ताेपर्यंत तुम्हीतोपर्यंत तुम्ही गुन्हेगार ठरता. हे ट्रेडमिलवर धावण्यासारखे आहे, जसे तुम्ही धावता पण तुम्ही एकाच ठिकाणी उभे राहता. हे विसरू नका, असा सल्लाही पाटेकर यांनी विद्यार्थ्यांना (student) दिला. (Breaking Marathi News)

‘तुम्हाला कुणी जात-पात, धर्मात अडकवलं तर ते समाजातील सर्वात मोठा गुंड आहे. प्रत्येक जातीने, समाजाने आपल्या धर्माला पुढे नेण्याचे काम केले आहे. त्यामुळे सर्वांचे आभार मानतो, त्यांच्यापुढे नतमस्तक होतो असेही नाना यांनी नमूद केले. नानांच्या उत्तरावर भारावलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EXIT POLL मध्ये महायुतीची सरशी; अंदाज जाहीर होताच रंगली राज ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या भविष्यवाणीची चर्चा

Friday Horoscope : मंदिरात जाऊन अन्नपदार्थ दान करावेत; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

आयोगानं वापरलं शाईऐवजी मार्कर; मतदानाची शाई एका मिनिटात गायब

Municipal Election: केंद्रावर जाण्याआधीच दुसऱ्याच कुणी बोगस मतदान केलं; मतदाराला बॅलेटवर मतदानाची संधी, कुठे घडला प्रकार?

महापालिका निवडणुकांचं मतदान होताच ZP ची तयारी सुरु; राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या बड्या नेत्यांची गुप्त बैठक

SCROLL FOR NEXT