Maharashtra’s No. 1 Marathi News Portal - Esakal AI Image
महाराष्ट्र

E sakal No.1 : ई-सकाळ पुन्हा एकदा नंबर १; ५५ कोटी वाचकांनी दाखवला विश्वास

Maharashtra’s No. 1 Marathi News Portal: ई सकाळ वेबसाइटने पुन्हा एकदा डिजिटल न्यूजमध्ये बाजी मारली आहे.ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा ई सकाळ वेबसाइटवर सर्वाधिक युजर्संनी भेट दिली आहे.

Alisha Khedekar

सध्या सर्वाधिक लोकांचा कल हा डिजिटल युगाकडे आहे. हा वर्ग वाचनापेक्षा व्हिडिओ आणि दृकश्राव्य माध्यमांकडे जास्त आकर्षित होतो. असे असतानाही ‘सकाळ’ने आपला वाचकवर्ग टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये ई-सकाळच्या वाचकसंख्येत सातत्याने वाढ होत असून, न्यूज पोर्टलने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. याला कारणीभूत आहे बातमीतील सत्यता.

कॉमस्कोर मल्टी-प्लॅटफॉर्मच्या ताज्या आकडेवारीनुसार, ई-सकाळ (esakal.com) हे सर्वाधिक वाचकसंख्या असलेले न्यूज पोर्टल ठरले आहे. विशेष म्हणजे, गेले कित्येक महिने ई-सकाळने पहिल्या क्रमांकावर विजयाचा झेंडा रोवला आहे. डिजिटल पत्रकारितेच्या स्पर्धात्मक वातावरणात मिळालेले हे यश महत्त्वाचे मानले जात आहे.

ई-सकाळच्या डिजिटल नेटवर्कमध्ये गोमंतक, साम, अॅग्रोवन आणि सकाळ यांसारख्या विविध वेब पोर्टल्सचा समावेश आहे. या माध्यमांद्वारे राज्यासह देश-विदेशातील घडामोडी, राजकारण, शेती, अर्थकारण आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरील ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवल्या जातात.

विश्वासार्हता, अचूक माहिती आणि वाचकांच्या गरजांना प्राधान्य देणे, ही ई-सकाळच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये आहेत. वाचकांना दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारी माहिती वेळेवर देण्यावर भर दिला जातो. वाचकांचा वाढता प्रतिसाद आणि विश्वास यामुळे ई-सकाळने डिजिटल विश्वात आपले अव्वल स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Second Liver Transplant: 19 वर्षांपूर्वी वडिलांनी दिलं यकृत, आता आईनेही घेतला पुढाकार; मुंबईत तरुणावर दुसरं लिव्हर ट्रान्सप्लांट

तणावामुळे श्वास घेण्यास अडचण येतेय? 'या' ३ तंत्रांचा वापर करा; नक्की मिळेल आराम

Maharashtra News Live Update: सोलापूर डीसीसी बँक निवडणूक, बाळराजे पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Bribe Case : मुंबईत खळबळ! बड्या अधिकाऱ्याला १५ लाखांची लाच घेताना रंगे हात पकडलं

Mustard Oil for Back Pain Relief: कंबरदुखीच्या त्रासावर मोहरीच्या तेलाचा सर्वात सोपा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT