Maratha Reservation News  Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation : मनोज जरांगे आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळात कोणत्या ६ मुद्द्यांवर चर्चा झाली? सगेसोयरे कोण? याची व्याख्याही जरांगेंनी सांगितली

Manoj Jarange on maratha reservation news : सगेसोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र देताना त्यात कोण-कोण असेल याबाबतची व्याख्याच मनोज जरांगे यांना राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला सांगितली आहे.

प्रविण वाकचौरे

Manoj Jarange News :

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मराठा बांधवांसह अंतरवाली सराटी येथून मुंबईत पायी येण्यावर ते ठाम आहे. मात्र सरकार मनोज जरांगे यांच्याशी बोलून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारकडून मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे आणि आमदार बच्चू कडू यांनी काल मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली.

कुणबी दाखल्यांबाबत सगेसोयरे या शब्दावरुन मोठा संभ्रम तयार झाला आहे. सगेसोयरे म्हणजे नेमंक कोण? याबाबत राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्या व्याख्या भिन्न आहेत. मात्र सगेसोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र देताना त्यात कोण-कोण असेल याबाबतची व्याख्याच मनोज जरांगे यांना राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला सांगितली आहे. (Latest Marathi News)

आमदार बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांच्यासोबत १७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत काय ठरले होते? मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत ? आणि अध्यादेशात काय असावं? याबाबत सविस्तर चर्चा बैठकीत झाली.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?

1. ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली आहे, त्याच कुणबी नोंदीच्या आधारेच त्यांच्या गणगोतातील सर्वच सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे, देण्यात येत आहे.

2. ‘सगेसोयरे व्याख्या‘ : मराठा समाजात पिढ्यानपिढ्या परंपरेनुसार गणगोतात लग्नाच्या सोयरिकी जुळतात, त्या सर्वच सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. जिथे जिथे मराठा समाजात गणगोतात लग्नाच्या सोयरिकी जुळतात. त्या त्या सर्वच सोयऱ्यांना नोंद सापडलेल्या मराठा बांधवांच्याच नोंदीच्या आधारेच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, देण्यात येत आहे. ही व्याख्या करा, असे जरांगे सांगत आहेत.

3. ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली नाही, अशा मराठा समाजातील सर्व व्यक्तींना ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली आहे, त्याच सापडलेल्या नोंदीच्या आधारेच नोंद न सापडलेला मराठा बांधवांना त्यांचा गणगोतातील सगासोयरा समजून सर्वच त्यांच्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, देण्यात येते आहे.

4. राज्यात ज्या मराठा बांधवांच्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्व मराठा बांधवांना 20 जानेवारी 2024 च्या आतच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.

5. राज्यात ज्या मराठा बांधवांच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या रक्ताच्या परिवारातील नातेवाईकांनाही 20 जानेवारी 2024 च्या आताच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.

6. राज्यात ज्या मराठा बांधवांच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या गणगोतातील सर्वच सोयऱ्यांना वरिल नोंदीच्या आधारे "सोयरा" समजून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Fort : भक्कम दुहेरी तटबंदी अन् वैभवशाली इतिहास, सोलापूरमध्ये तलावाच्या काठी वसलाय भव्य किल्ला

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Accident: समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात; पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले

Deool Band 2 Collection : स्वामी भक्तीत प्रेक्षक तल्लीन! प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, वाचा संडे कलेक्शन

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय अन्यथा...

SCROLL FOR NEXT