Nawab Malik, ED Raid
Nawab Malik, ED Raid Saam TV
महाराष्ट्र

Nawab Malik: फ्लॅट, शेतजमीन अन् बरंच काही...नवाब मलिकांची जप्त संपत्ती कुठे आणि किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी -

मुंबई: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीनं अटक केल्यानंतर सध्या तुरुंगात असलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात ईडीनं मोठी कारवाई केली आहे. ईडीनं त्यांच्या मुंबईसह राज्यातील इतर भागांतील मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये फ्लॅट, व्यावसायिक मालमत्ता आणि शेतजमिनीचा समावेश आहे. ईडीनं त्यांची जप्त केलेली मालमत्ता कुठे आणि किती आहे, जाणून घेऊयात सविस्तर...

हे देखील पहा -

नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर सध्या ते तुरुंगात आहेत. आता पुन्हा ईडीनं मलिक यांना मोठा दणका दिला आहे. ईडीनं त्यांच्या विविध आठ मालमत्तांवर टाच आणली आहे. त्यात मुंबईतील कुर्ला पश्चिमेकडील गोवावाला कम्पाऊंड, कुर्ला पश्चिमेकडील व्यावसायिक मालमत्ता, उस्मानाबादमधील तब्बल १४७.७९४ एकर शेतजमीन, कुर्ला पश्चिमेकडील तीन फ्लॅट, तसेच वांद्रे पश्चिमेकडील दोन फ्लॅट आदी मालमत्तांचा समावेश आहे.

१४७.७९४ एकर शेतजमीन नेमकी कुठे?

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने केलेल्या कारवाईनंतर आता उस्मानाबाद येथील त्यांची शेतजमीन जप्त केली आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांनी उस्मानाबाद शहरापासून अवघ्या १० किलोमीटरवर असलेल्या अळणी आणि जवळा (दू.) या शिवारात तब्बल दीडशे एकर जमीन खरेदी केली आहे.या प्रकरणाची तक्रार भाजपकडून करण्यात आली होती. २०१३ मध्ये मलिक यांच्या पत्नी मेहजबीन मलिक यांच्यासह त्यांच्या मुली, मुलगा, जावई अशा सहा जणांनी ही शेतजमीन वसंतराव मुरकुटे व त्यांच्या कुटुंबाकडून २ कोटी ७ लाख रुपयांत विकत घेतली आहे. यासाठी त्यांनी सरकारला ८ लाख ४० हजार रुपये इतके मुद्रांक शुल्क भरले. दरम्यान, ज्या महिन्यात हा व्यवहार झाला, त्याच महिन्यात या एकूण जमिनीचे शासकीय व्हॅल्युएशन करून घेतले असता, ते ३ कोटी २९ लाख रुपये इतके निघाले. त्यामुळे १ कोटी २२ लाख रुपयांचा मुद्रांक शुल्क मलिक कुटुंबीयांनी चुकविला असल्याचा आरोप भाजपने केला होता. ही जमीन खरेदी करीत असताना, येथील संपूर्ण जमीन बागायती होती. मात्र कागदोपत्री ही जमीन जिरायती दाखविण्यात आली. या शेतीत जवळपास ५५ लाख रुपयांचा बंगला असताना, त्याची नोंद करण्यात आली नाही. तसेच खरेदीदारांनी खरेदी करणारे सर्व जण एकाच घरात राहतात आणि शेती व घरकाम करतात, असा उल्लेख असून त्यासंबंधीचा कुठलाही पुरावा दिला नाही. या शेतकऱ्यांकडे तेव्हा दीडशे एक्कर जमीन खरेदी करण्यासाठी एवढा पैसा कोठून आला? असा सवाल भजपकडून विचारण्यात आला होता. आता हीच शेतजमीन ईडीने जप्त केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : संभाजीनगरात ड्रग्स, गुटख्यासह ७७ लाखांची दारू जप्त; आचारसंहितेची सुरुवात झाल्यापासूनची कारवाई

Live Breaking News : कोल्हापूर मतदारसंघात सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 38.42 टक्के मतदान

Kolhapur Election: हळहळ! मतदान केंद्राबाहेरच वृद्धाला हृदयविकाराचा झटका, रांगेतच सोडला जीव

Gujrat News: अजब गजब... गणितात २०० पैकी २१२ अन् भाषेत २११ गुण; मुलीचं मार्कशीट व्हायरल

PM Narendra Modi: ...तर तुम्ही तुमच्या मुलाचं भविष्य खराब करताय!; PM मोदींनी मुस्लिम बांधवांना केलं सावध

SCROLL FOR NEXT