Ajit Pawar and Eknath Shinde Devendra Fadnavis Latest news in Marathi SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Expansion Update : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजित पवार यांचं मोठं वक्तव्य, चेंडू मुख्यमंत्री शिंदेंच्या कोर्टात

Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्री जेव्हा निर्णय घेतली तेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे ते म्हणाले.

Nandkumar Joshi

Ajit Pawar On Maharashtra Cabinet Expansion :

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असे वृत्त असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा अधिकार पूर्णतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो, असं अजित पवार यांनी सांगितलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. याबाबत आज, सोमवारी अजित पवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली. त्यावर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याचं उत्तर अजित पवार यांनी दिलं.

सध्या आपल्यासमोर दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, कांदा, इथेनॉल आदी वेगवेगळे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य द्यायचे ठरवले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पूर्ण अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. ते निर्णय घेतील तेव्हा तो होईल, असे पवार यांनी सांगितले.

दिल्लीला जाणार

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत जाणार आहेत. यासंदर्भातही पवार यांनी माहिती दिली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पावसामुळं झालेले नुकसान, कांदा आदी प्रश्नांवर बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहोत. अमित शहा आणि संबंधितांच्या भेटी घेऊन चर्चा करणार आहोत, असेही पवार यांनी सांगितले.

दिल्लीत सोमवार किंवा मंगळवारी जाऊ असं फडणवीस म्हणाले होते. हिवाळी अधिवेशन सुरू आहे. इथले कामकाज लक्षात घेऊन जावे लागणार आहे. तशा प्रकारचे नियोजन होणार आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना अद्याप मदत दिली नाही, असा आरोप विरोधक करत आहेत. त्यावरही अजित पवार यांनी भाष्य केले. मधल्या काळात कॅबिनेटमध्ये संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना तशा सूचना केल्या होत्या. नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करा असे सांगितले होते.

त्यानुसार अनेक मंत्री, पालकमंत्री वेगवेगळ्या भागांत जाऊन पाहणी करून आले. पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या होत्या. युद्धपातळीवर काम सुरू आहे. पंचनामे झाल्याशिवाय पिके, फळबागा आदींचे किती नुकसान झाले आहे, त्याची आकडेवारी समोर येणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT