when will farmers get crop insurance and loan questions ravikant tupkar  Saam Digital
महाराष्ट्र

Ravikant Tupkar News: ...तर आमचा माेर्चा मुंबईच्या दिशेने, रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा

when will farmers get crop insurance and loan questions ravikant tupkar: पेरणी झाल्यानंतर पिक कर्जाच फायदा काय परंतु राष्ट्रीयकृत बँकांनी पाठीशी घालण्याचं काम सरकार करीत असल्याचा आरोप रविकांत तुपकरांनी केला आहे.

संजय जाधव

न्याय प्रक्रियेत दोन ओळींचा फायदा पिक विमा कंपन्या घेत असल्याने शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही. जर शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा मिळाला नाही तर आम्ही मुंबईतील पिक विम्याचे ऑफिस ठिकाण्यावर ठेवणार नाही. आमचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघेल असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज (साेमवार) बुलढाणा येथे साम टीव्हीशी बाेलताना राज्य सरकारला दिला.

रविकांत तुपकर म्हणाले पिक विमा संदर्भात आम्ही कृषी मंत्री धनंजय मुंडे व कृषी सचिवांच भेट घेतली. त्यांना शेतक-यांना पिक विमा मिळत नसल्याची अडचणी सांगितल्या. राष्ट्रीयकृत बँका पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा शेतकऱ्यांना त्रास देत आहे. बुलढाणा जिल्ह्यात फक्त 28 टक्के पिक कर्ज वाटप केले आहे. पेरण्या झाल्यावर पिक कर्ज देणार आहात काय असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केला.

तुपकर पुढं बाेलताना म्हणाले कर्ज भरून घेताना हे बँका वाले गोड गोड बोलतात नंतर कर्ज देताना मात्र त्यात फाटे फोडतात. त्यामुळे असंख्य शेतकरी पिक कर्ज पासून वंचित राहत आहेत. पुनर्गठन करण्याची बोंब आहे, पुनर्गठन करण्याचे आदेश आहेत मात्र बँका पुनर्गठन करीत नाहीत. हे अतिशय दुर्दैवी आहे. सरकार नावाची यंत्रणा काय करत आहे, मुख्यमंत्री काय करताहेत, अर्थमंत्री व रिझर्व बँक काय करत आहे असा सवाल तुपकरांनी उपस्थित केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT