Dhananjay Munde saam tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचं काय कारण दिलं? ट्विट करत दिली माहिती

Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा ट्विट केलं आहे. यामध्ये मुंडे यांनी आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

महायुती सरकारचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुंडेंवर आरोप होतायत. दरम्यान अशातच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा ट्विट केलं आहे. यामध्ये मुंडे यांनी आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.

ट्विटमध्ये काय म्हणालेत धनंजय मुंडे-

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.

या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांचे पीए राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर दाखल झाले होते. त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा सुपूर्द केला. बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुंडेंवर आरोप करण्यात येत होते. आज विधीमंडळ सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधीच धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठवला होता.

काल सरपंच देशमुख यांच्या हत्येचे तसंच त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचे फोटो समोर येताच राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला. अखेर धनंजय मुंडे यांना या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा स्विकारला असून तो राज्यपालांकडे पाठवला असल्याची माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT