Devendra Fadnavis budget statement  Saam TV Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय काय मिळालं? देवेंद्र फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

what Maharashtra gets from Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधा, ग्रोथ हब, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Namdeo Kumbhar

Devendra Fadnavis budget statement : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारने ५३.५ लाख कोटी रुपयांच्या एकूण खर्चाचा आराखडा मांडला. पायाभूत सुविधा, संरक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसतेय. केंद्राच्या या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठीही मोठ्या घोषणाकरण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात राज्याला काय काय मिळाले, याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई आणि पुणे मेट्रोसाठी विशेष पॅकेजची घोषणा झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाला विकसित भारताकडे नेणारा दमदार अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे.

विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत, असे देवंद्र फडणवीस म्हणाले. ते अर्थसंकल्पानंतर बोलत होते.

लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. प्रत्येक ग्रोथ हबसाठी 5000 कोटी प्रत्येकी 5 वर्षांत प्राप्त होणार आहेत, त्याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबसाठी होणार आहे, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अर्थसंकल्पाचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे. विकसीत भारताकडे नेहणारे हे बजेट आहे. औद्योगिक सवलतीमुळे फोठा फायदा होणार आहे. उद्योग गुंतवणुकीचा आपल्याला फायदा होणार आहे. रेल्वे कोरिडॉरमुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरातील प्रवास अधिक वेगवान होणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat sleeper : मुंबई-पुणे-बंगळुरू वंदे भारतचा मार्ग ठरला, तिकिटाच्या किंमतीही समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची डेडलाइन वाढली; रजिस्ट्रेशन कसं कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

नवऱ्याची क्रूरता... बेदम मारहाण करत बायकोच्या गुप्तांगामध्ये घातले 10 इंच ब्लेड

Saturn transit: त्रिग्रही योगात शनीचं गोचर; पुढचे 6 महिने 3 राशी कमावणार बक्कळ पैसा

Paneer Tikka Masala Recipe: घरी अचानक पाहुणे आलेत? जेवणासाठी टेस्टी करायचं आहे? मग झटपट बनवा पनीर टिक्का मसाला

SCROLL FOR NEXT