रणजीत माझगावकर साम टीव्ही, कोल्हापूर
दत्तक येणं किंवा दत्तक घेणं हा काही गुन्हा नाही. प्राचीन काळापासून भारतात ही प्रथा चालू आहे. कोल्हापूर किंवा सातारा गादीवर अनेक वेळा दत्तक घेण्यात आले आहेत. खासदार संजय मंडलिक यांनी जे विधान केले आहे. ते इतिहासाशी विसंगत विधान आहे.संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपतींबाबत (Adopted Shahu Maharaj) आताचे महाराज हे खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तकच आहेत, असं विधान केलं होतं. (Latest Marathi News)
रक्ताच्या नात्याने शाहू महाराज हे राजर्षी शाहू महाराज यांचे खापरपंतू आहेत. राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) आणि सध्याचे शाहू महाराज छत्रपती यांचे नेमकं नातं काय आहे. याचा उलगडा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. शाहू महाराज हे काही आफ्रिका किंवा ब्रिटनमधून आलेले नाहीत, ते इथलेच आहेत, असं त्यांनी म्हटलं (Shahu Maharaj Kolhapur) आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शाहू महाराजांच्या कन्या राधाबाई साहेब यांचे पुत्र विक्रम सिंह पवार त्यांची कन्या शालिनी राजेंचे ते पुत्र आहेत. शाहू महाराज बाहेरून येवून गादीवर बसले नाहीत, तर शहाजी राजेच कोल्हापूरचे छत्रपती (Kolhapur News) होते. शाहू महारांजाची सर्व जडणघडण शहाजीराजेंच्या देखरेखीखाली झाली आहे. शाहू महाराज कोल्हापूरच्या फुटबॉल टीमकडून खेळलेले आहेत. त्यांचं सर्व शिक्षण आणि जडणघडण कोल्हापूरमध्ये झाली आहे.
कोल्हापूरच्या प्रत्येक घटकाशी आताच्या शाहू महाराजांनी जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध निर्माण केलेले (Shahu Maharaj News) आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजर्षी शाहू महाराज देखील दत्तक होते. सयाजीराव गायकवाड महाराज देखील दत्तक होते. दत्तक येणं हा गुन्हा नाही. दत्तक आल्यानंतर त्या गादीचा, त्या घराण्याचा, त्या संस्थानाचा सन्मान कसा ठेवला जातो, हे महत्वाचं आहे. या शाहू महाराजांनी तो ठेवलेला आहे.
इतकंच नाही छत्रपती शिवाजी महाराज, (Politics News) शाहू महाराज यांच्या समतेचा विचार या शाहू महाराजांनी सतत जागृत ठेवला आहे. त्यामुळे शाहू महाराज हे जरी दत्तक असले, तरी ते राजर्षी शाहू महाराजांचे विचारांचे खरे वारसदार आहेत. असं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.