Diwali Pataka History Saam TV
महाराष्ट्र

Diwali Pataka History: दिवाळी सणाला फटाके फोडण्याची परंपरा कधीपासून सुरु झाली? वाचा संपूर्ण इतिहास

साम टिव्ही ब्युरो

तुषार ओव्हाळ

Diwali Pataka History:

प्रत्येक दिवाळीत फटाक्यांच्या प्रश्नावर वाद होतो. कोर्टाने या वर्षीही फटाके फोडण्याची वेळ ठरवून दिलीये. यंदा दिल्लीसोबत मुंबईचीही हवा प्रदूषित झालीये. फटाके फोडू नका असं आवाहन पर्यावरणवाद्यांनी केलंय. तर राज्य सरकरानेही प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची विनंती केलीये. या सगळ्यात एक प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे दिवाळी आणि फटाक्यांचा संबंध आहे? दिवाळी सणाला फटाके फोडण्याची परंपरा कधीपासून सुरु झाली? काय आहे फटाक्यांचा इतिहास? ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फटाक्यांच्या इतिहासावर १९५३ साली पी के गोडे यांनी एक पुस्तिका प्रकाशित केलीये. या पुस्तकात प्राध्यापक गोडे यांनी १४०० ते १९०० पर्यंत भारतातल्या फटाक्यांचा इतिहास सांगितलाय. जेव्हा राम, सीता आणि लक्ष्मण वनवास संपवून अयोध्येत आले. तेव्हा दिवे लावून त्यांचं स्वागत करण्यात आलं. फटाके फोडून त्यांचं स्वागत केल्याचा कुठेही उल्लेख नाही.

फटाक्यात प्रमुख केमिकल वापरलं जातं, ते म्हणजे गनपावडर. या गनपाडवरचा शोध चीनमध्ये लागला. आधी युध्दासाठी वापरली जाणारी ही गनपावडर पुढे फटाक्यांसाठी वापरली गेली. या गनपावडरचा शोध जरी चीनने लावला, तरी युरोप आणि भारतीयांना गनपावडरची ओळख ही अरबांनी करून दिली.

भारतात पहिल्यांदा फटाके वापरले ते अब्दुर रझाक याने. १४४३ साली विजयनगरच्या देवराया राजाच्या दरबारात महानवमी साजरी झाली. तेव्हा पहिल्यांदा फटाके फोडले गेले.

बिजापूरचा सुलतान इब्राहिम अदिल शहाने १६०९ साली आपल्या मुलीच्या लग्नात ८० हजार रुपयांचे फटाके फोडले होते. निजाम असो वा मुघल, आपला थाट दाखवण्यासाठी हे राजे आतिषबाजी करत. एखाद्या राजघराण्यात लग्न असो वा समारंभ किंवा राज्याभिषेक. तेव्हा मोठ्या प्रमाणात राज्यातील जनतेला निमंत्रण देऊन त्यांच्यासाठी आतिषबाजी केली जायची.

पेशव्यांची बखरमध्येही फटाक्यांचा उल्लेख आढळतो. महादजी शिंदे यांनी सवाई माधवराव यांची भेट घेतली. तेव्हा राजस्थानच्या कोटामधील राजाने दिवाळीत आतिषबाजी केल्याचं शिंदे यांनी वर्णन केलं. कोटामध्ये रावणदहनासाठी फटाक्यांचा कसा वापर केला हे ही शिंदेंनी पेशव्यांना सांगितलं. तेव्हा सवाई माधवराव पेशव्यांनी पुण्यातही दिवाळीच्या वेळी आतिषबाजी करण्याचे आदेश दिले. तेव्हा पहिल्यांदा पुणेकरांनी फटाक्यांची आतिषबाजी पाहिली.

19 व्या शतकात कोलकात्यात पहिला फटाक्यांचा कारखाना उभा राहिला. तेव्हा तमिळनाडूचे नाडर बंधू कोलकात्यात गेले आणि हे फटाक्यांचं तंत्र शिकून परत आले. त्यांनी शिवकाशीमध्ये फटाक्यांचा कारखाना सुरु केला. तेव्हापासून शिवकाशी ही फटाके निर्मितीच केंद्र झालं. स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची निर्मिती झाली. मागणी वाढली तसा पुरवठाही झाला. काळाच्या ओघात दिवाळी आणि फटाके हे समीकरण रूढ झालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT