Devendra Fadnavis saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: भाजपच्या काळात काय काय बदललं? विकसित भारत कार्यक्रमात फडणवीसांनी सांगितलं सर्वकाही

Viksit Bharat : पुण्यातील विकसित भारत कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारमध्ये झालेल्या कामांची माहिती दिली. भारताची अर्थव्यवस्था कशी बदलली हेदेखील सांगितले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Devendra Fadnavis In Viksit Bharat Pune Conclave Program :

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी सांगितलेल्या विकसीत भारत संकल्पनेवर २००० ते २०१४ पर्यंत काहीच काम झालं नाही. २०१४ पासून कलाम यांच्या संकल्पनेवर खरे काम सुरू झाले, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लागवला. पुण्यातील विकसित भारत कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. देशात भाजपचं सरकार आल्यानंतर काय बदल झाला याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Latest News)

अब्दुल कलाम यांनी सांगितलेल्या विकसित भारत संकल्पनेवर २००० ते २०१४ पर्यंत काहीच काम झाले नाही. २०१४ पासून कलाम यांच्या संकल्पनेवर खरे काम सुरू झाले. २०१३ मध्ये भारताची अर्थव्यवस्था फ्राजाईल ५ मध्ये होती. तेथून पुढील १० वर्षात म्हणजे २०२३ मध्ये आपण जगातील पहिल्या ५ मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये आलो. मागच्या काळात फक्त टु जी, थ्री जी, जिजाजी स्कॅम पहायला मिळायचे, असा टोला काँग्रेसला लगावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अर्थव्यवस्था बदलली

आता महाराष्ट्राशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन आहे. ६० कोटी लोकांचे बॅंकेत अकाऊंट नव्हते. मोदींमुळे या लोकांची बॅंकेत खाती उघडली गेली. नऊ वर्षात २५ कोटी लोक गरिबी रेषेच्यावर आले. हा जागतिक विक्रम असल्याचं फडणवीस म्हणाले.

आधी एक हॅाटेल उभारायचे असेल तर १४६ सर्टीफिकेट लागायची. ती आम्ही २५वर आणली. असेच प्रत्येक व्यवसायात होते. तिथे आम्ही वन विन्डो योजना आणली. ५० टक्के अर्थव्यवस्था कॅशमध्ये सुरू होती. ती बंद होऊन सगळे व्यवहार व्हाईटमध्ये आले. भारतात याआधी टेलिफोन बॅकिंग होते. म्हणजे एखादा नेता फोन करुन सांगायचा, हा माझ्या जवळचा आहे. त्याला लोन द्या. मग कर्ज घेतलेला व्यक्ती परत पैसेच भरायचा नाही , असं म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला मारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT