Reasons for Raj Uddhav Thackeray Alliance Saam Tv News
महाराष्ट्र

Raj-Uddhav Thackeray Alliance : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची ५ महत्वाची कारणं, पडद्यामागचं राजकारण काय?

Raj Thackeray and Uddhav Thackeray Coming Together : राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना साद घातल्यानंतर त्यांनी सुद्धा अटी-शर्तींच्या आडून महाराष्ट्राच्या हितासाठी प्रतिसाद दिला.

Prashant Patil

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कायम एकमेकांविरोधात तोफ डागणारे दोन पक्षाच्या नेतृत्वाने अचानक संभाव्य मनोमिलनाचे संकेत दिले आहे. राजकारण केव्हा आणि कसं वळण घेईल हे सांगता येत नाही. आता तर ‘मौका भी है और दस्तूर भी’ असं वातावरण आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना साद घातल्यानंतर त्यांनी सुद्धा अटी-शर्तींच्या आडून महाराष्ट्राच्या हितासाठी प्रतिसाद दिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागील कारणं नेमकं काय आहेत, ते आपण जाणून घेऊया.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची कारणं

१. उद्धव ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई

लोकसभेत जोरदार कामगिरी करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाला विधानसभेत मोठा झटका बसला. महाविकास आघाडीला जनतेने नाकारले. ईव्हीएम मतदानात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा सुपडा साफ झाला. आता राजकीय अस्तित्वाची निकाराची लढाई पक्षासमोर उभी ठाकली आहे. राज ठाकरे यांनी दिलेली हाक त्यादृष्टीने महत्त्वाची आहे. मुंबई महापालिका हातची जाऊ द्यायची नसेल तर मराठीच्या मुद्यावर दोन्ही बंधु एकत्र येऊ शकतात.

२. विधानसभेच्या निकालाने ठाकरेंची झोप उडवली

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या नावावर आणि नवीन चिन्हासह उद्धव ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीत उतरले होते. खरंतर ही त्यांच्यासाठी अग्नीपरीक्षाच होती. उद्धव ठाकरे गटाने राज्यात ९५ जागांवर उमेदवार उभे केले होते. पण त्यांना केवळ २० जागांवर विजय मिळवता आला. त्यातील १० जागा मुंबईतील होत्या. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ८१ जागांवर उमेदवार दिले आणि ५७ जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनाही अपेक्षित यश आलं नाही. त्यामुळे आता मराठी भाषा, महाराष्ट्र या मुद्यावर दोन्ही ठाकरे एकत्र येऊ शकतात.

३. विधानसभेत मनसेचं खातं उघडलं नाही

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आलेख गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून सातत्यानं घसरल्याचं दिसून आलं आहे. पक्ष स्थापनेपासून मराठीच्या झंझावातावर मनसेनं मोठा विजय मिळवला होता. २००९ मधील निवडणुकीत मनसेनं १३ जागांची कमाई केली होती. तर २१४मध्ये त्यांना एकाच जागेवर समाधान मानावं लागलं होतं. २०१९ आणि २०२४च्या निवडणुकीत त्यांना साधं खातंही खोलता आलं नाही.

४. मुलाचा पराभव जिव्हारी

लोकसभेत महायुतीला बिनशर्त मदत केली. एकही उमेदवार दिला नाही. तरीही महायुतीने माहीममध्ये मुलाला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे अमित ठाकरेंचा झालेला पराभव जिव्हारी लागला. माहिम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे उमेदवार महेश सावंत यांनी शिंदे गट आणि मनसेला धक्का दिला. आता मनसेला राजकीय प्रवाहात मोठ्या चमत्काराची गरज आहे. मराठी आणि महाराष्ट्र या मुद्याभोवती राजकारण तापवलं तर मनसे आणि उद्धव ठाकरे गटाला भविष्यात चांगलं यश मिळू शकतं.

५. येती मुंबई महापालिका निवडणूक

राज्यातील महापालिका निवडणुका तोंडावर आहे. ही निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. महायुतीत जागा अधिक मिळणार नाही. तीन बलाढ्य पक्षांच्या तुलनेत कमी जागा मिळतील. त्यामुळे महायुतीच्या पाठी फरफरटत जावं लागेल ही मनसेला भीती असण्याची शक्यता आहे. तर पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

६. दोघांनी एकत्र यावं ही लोकभावना

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावं ही जनतेची देखील इच्छा आहे. एकत्र आल्यानंतर त्याचा महापालिकेत चांगला परिणाम होऊ शकतो, असं जनमत आहे. तर सध्या मुंबईत इतर भाषिकांची सुरू असलेली दादागिरी, नित्याचे वाद यामुळे मराठी माणूस नाराजच नाही तर संतापलेला आहे. त्यांना एक चांगल्या पर्यायाची प्रतिक्षा आहे. राज ठाकरे -उद्धव ठाकरे एकत्र आल्यास सत्ताधाऱ्यांची डोकेदुखीही साहजिक वाढू शकते.

७. दोघांना राजकीय अस्तित्व टिकवण्याचं आव्हान

पाच वर्ष राज्यातील सरकार स्थिर आहे. बहुमताचा मोठा आकडा सरकारकडे आहे. त्यामुळे पक्ष फुटीपासून ते राजकीय अस्तित्व टिकवण्याचं आव्हान उद्धव ठाकरे गटासमोर असेल. तर मनसेला प्रभावाचा परीघ वाढवायचा आहे. त्यासाठी दोन्ही बंधु एकत्र आल्यास पूरक भूमिकेचा फायदा होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार २०० मीटर लांब चेंडूसारखी उडाली; अपघाताचा थरारक VIDEO

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Irshalgad Fort : रायगड फिरायला जाताय, मग इर्शाळगड पाहाच

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

SCROLL FOR NEXT