व्हेल माशाची कोट्यावधीची 'उलटी' जप्त ! SaamTv
महाराष्ट्र

व्हेल माशाची कोट्यावधीची 'उलटी' जप्त !

व्हेल माशाची हि उलटी पाच किलो वजनाची असून भारतीय बाजारात या उलटीची किंमत सुमारे पाच कोटी रुपये आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगड : व्हेल माशाच्या उलटी प्रकरणात अलिबाग तालुक्यातील निलंबित पोलीस कर्मचारी आणि एकाला असे दोघांना मुंबई गुन्हे पथकाने नुकतेच अटक केले असल्याची घटना ताजी असताना माणगाव तालुक्यातील लोणारे येथे तस्करीसाठी व्हेल माशाची उलटी घेऊन जात असताना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एकाला बेड्या ठोकल्या आहेत. पाच किलो वजनाची उलटी हस्तगत केली असून भारतीय बाजारात या उलटीची किंमत पाच कोटी रुपये आहे. Whale vomit worth 5 Crores seized

हे देखील पहा -

रत्नागिरीतील दापोली येथून व्हेल माशाची वांती म्हणजेच उलटी बाजारात तस्करी साठी येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना समजली होती. त्यांच्या मार्गदनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने माणगाव तालुक्‍यातील लोणेरे येथे सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एका सिल्व्हर रंगाच्या स्कूटी वरून आलेल्या इसमाला थांबवून त्याचीचौकशी केली असता त्याच्या कडून पाच किलो वजनाची वांती म्हणजेच उलटी जप्त करण्यात आली.

भारतीय बाजारपेठेत या उलटीची किंमत पाच कोटी रूपये इतकी आहे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अंदाजे वीस कोटी रूपये किंमत असल्याचे बोलले जाते. सुगंधीत अत्तर बनविण्यासाठी या उलटीला मोठी मागणी असते. दुर्मिळ असलेल्या व्हेल माशाने खोल समुद्रात केलेली उलटी कालांतराने दगडा सारखी बनते या मध्ये आम्ब्रीन, अम्ब्रोक्झीन, अम्ब्रोनाॅल हि रसायने असतात.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT