Rain News Maharashtra Marathi Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast : राज्यात पुढचे ५ दिवस तुफान पाऊस; हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

Rain Alert In Maharashtra : महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Satish Daud

सलग दोन दिवस दडी मारल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस परतणार आहे. कारण, दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ५ दिवस किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस (Rain Updates) होईल. तर राज्याच्या इतर भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील.

हवामान खात्याने (IMD Weather Alert) आज शुक्रवारसाठी (५ जुलै) सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात दमदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून तुफान पावसाची शक्यता (Rain Updates) आहे. उत्तर व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढणार असून पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.

दरम्यान, गुरुवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि कोकणात सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी येथेही जोरदार पाऊस झाला. सध्या विदर्भात मुसळधार पावसाचे वातावरण असले तरी, हलक्या सरी वगळता फारसा जोरदार पाऊस पडलाच नाही.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही अद्याप हीच परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य व्यापलेला मान्सून कधी धो धो बरसणार याचीच प्रतिक्षा अनेकांना आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाने आता हीप्रतिक्षा संपल्यात जमा आहे. मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होऊन मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत शक्तीपीठ महामार्गावरून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा

Shocking : जन्मदात्या बापाचं हैवानी कृत्य; पोटच्या मुलीवर सलग ३ वर्ष बलात्कार

Sharara Designs: लग्न किंवा पार्टीसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी आणि सुंदर शरारा डिझाईन्स, तुम्ही दिसाल सगळ्यात फॅशनेबल

२८ वर्षांच्या तरुणीचं ६० वर्षीय मॅनेजरशी सूत जुळलं; दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, फोटो व्हायरल झाल्यानंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ

Crime News: हळदीच्या दिवशी विपरित घडलं; दोन वधू बहिणींचा संशयास्पद मृत्यू; तांत्रिक कनेक्शनमुळे परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT