Weather Update Saam TV
महाराष्ट्र

Weather Updates : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना अलर्ट

हवामान विभागाने मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Weather Updates : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारी मुंबई, नवी मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस (Rain) झाला. अचानक सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा (Weather) अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Latest Marathi News)

इतकंच नाही तर काही हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्टही जाहीर केला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पाऊस असणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापुरात पावसाचा जोर वाढणार आहे.

मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

हवामान विभागाने मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर भागात पावसाचा जोर असल्याची हवामान विभागाने माहिती दिली. (Maharashtra News)

परतीच्या पावसाचा प्रवास लवकरच

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य भारत तसेच वायव्य भारताच्या काही भागांमधून चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून माघार घेईल. महाराष्ट्रातील सध्याची गडगडाटासह पडणाऱ्या पावसाची परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्याही काही भागांमधून मान्सून माघार घेऊ शकतो अशी शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातून परतीच्या पावसाच्या तारखा अजूनही जाहीर केलेल्या नसल्या तरी मध्य भारतातून परतीचा प्रवास येत्या चार ते पाच दिवसांमध्ये होणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे या कालावधीत महाराष्ट्रातूनही परतीचा प्रवासाला सुरुवात होईल असे अनुमान आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वरमध्ये ऑनलाईन दर्शन पासमध्ये छेडछाड करून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Operation Mahadev : लष्कराचं 'ऑपरेशन महादेव' फत्ते; ३ दहशतवादी ठार, पहलगाम हल्ल्याचे संशयित असण्याची शक्यता

Accident: बारामतीत अपघाताचा थरार! ट्रकने वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO

मुंबई-पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

SCROLL FOR NEXT