Weather Update Saam TV
महाराष्ट्र

Weather Update: गारठा वाढला! महाराष्ट्रात थंडी पुन्हा परतली, जानेवारी ते मार्चदरम्यान देशात सरासरी पाऊस; आज कुठे कसं हवामान?

IMD Alert: जानेवारी महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने देशात थंडी कमी राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. तर राज्यात थंडीचा कालावाधी जास्त राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Priya More

गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. राज्यात आता पुन्हा थंडीचा कडाका वाढू लागला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशाच्या बहुतांशी भागात सरासरी इतका पाऊस (८८ ते ११२ टक्के) पडण्याची शक्यता आहे.

नवीन तयार झालेल्या वेस्टर्नस डिस्टर्बन्समुळे सध्या जम्मू-काश्मीर आणि त्यालगत उत्तर पाकिस्तानमध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील हवामानात देखील बदल जाणवू लागले आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने देशात थंडी कमी राहणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, गुजरात आणि पश्‍चिम मध्य प्रदेशात थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जानेवारी ते मार्च महिन्यांतील पावसाचा तसेच जानेवारी महिन्यातील पाऊस आणि तापमानाचा अंदाज बुधवारी हवामान विभागाने जाहीर केला.

जानेवारी महिन्यात वायव्य भारताचा पूर्व भाग, मध्य भारताचा उत्तर भाग आणि पूर्व भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील थंडी गायब झाली होती. राज्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाला पोषक परिस्थिती होती. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SDRF boats capsize: मोठी दुर्घटना! मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी उलटल्या; १० जवान बेपत्ता

Ramayana Movie Review : रामाची मर्यादा, रावणाचा अहंकार अन् सीतेची शक्ती; रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला?

Maharashtra News Live Update: ऊसदर आंदोलनाचा ट्रक चालकांना मोठा फटका, २० रुपयांची पाण्याची बाटली ५० रुपयांना

PWD Scam: कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांना अटक, सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ

Silent Health Warning: सकाळी उठताच थकवा आणि पोट फुगल्यासारखे वाटतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार

SCROLL FOR NEXT