सागर आव्हाड, साम प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातील 7 डिसेंबरपर्यंत हवामान ढगाळ राहणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. मात्र राज्यातील थंडी गायब झाली होती. मात्र राज्यातून गायब झालेली थंडी पु्न्हा परत येणार आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात वाढलेल्या किमान तापमानात पुढील दोन दिवसांत एक ते दोन अंशाने घट होईल. त्यामुळे पुढील आठवड्यात पुन्हा गायब झालेली थंडीला सुरवात होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. काल शहरातील किमान तापमान १८ तर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस इतके होते. राज्यात चक्रीवादळामुळे झालेल्या हवामान बदलामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा आणि मराठवड्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे कमाल व किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आणि थंडी गायब झाली.
पुढील २४ तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. त्यानंतर हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हुडहुडी भरणारी थंडी गायब झाली. ढगाळ वातावरणामुळे ८ अंशावरील किमान तापमान २० अंशाच्या पुढे गेले. तर २५ अंशापर्यंत खाली आलेले कमाल तापमान ३२ अंशाच्या पुढे गेले. त्यामुळे मागील तीन ते चार दिवसांपासून उकाडा वाढला.
काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. आज शहरातील आकाश निरभ्र तर दुपारनंतर ढगाळ वातावरण होईल. त्यानंतर किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट होईल. त्यामुळे पुढील आठवड्यात शहरासह जिल्ह्यात थंडीला पुन्हा सुरूवात होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मागील दोन दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानात वाढ झाली. वातावरणातील आर्द्रता वाढली असून ती अनुक्रमे ७२ टक्के नोंदवली गेली. त्यामुळे हवामान दमट असून मुंबईकरांना ऐन हिवाळ्यात घामाच्या धारांचा सामना करावा लागतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.