IMD Rain Alert in Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

IMD Rain Alert : राज्यात पुढील ३-४ तासांत मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस; IMD कडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Weather Update Today Maharashtra : भारतीय हवामान खात्याने पुढील ३-४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Satish Daud

यंदा मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात वेळेआधी दाखल झाला होता. पहिल्या दोन दिवस पावसाच्या जोरदार सरी बरसल्यानंतर मागील १० दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली होती. पेरण्या खोळंबल्याने शेतकरी पावसाची आतुरनेने वाट पाहत होते.

त्यानंतर गुरुवारी (ता. २० जून) पावसाने जोरदार पुनरागमन केले. मुंबई, पुणे ठाण्यासह राज्यातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. येत्या २४ तासांतही पावसाची हीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोकणासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल, असा इशारा आयएमडीने दिला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा एकदा मौसमी पाऊस सक्रिय झाला आहे. येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात येत्या ३-४ तासांत जोरदार पाऊस होऊ शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूरसह अन्य जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबारसह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून मुंबईत मोसमी पावसाने विश्रांती घेतली होती.परिणामी, तापमानात वाढ झाल्याने मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. बुधवारपासून मुंबई आणि उपनगरांत पावसाने हजेरी लावली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT