महाराष्ट्र

Weather Update: महाराष्ट्रासह 'या' ५ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा; विदर्भ, मराठवाड्याला कोणता अलर्ट? जाणून घ्या

Mahrashra Rain Update: मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या 5 राज्यांमध्ये 1 सप्टेंबर रोजी शनिवारी दुपारी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे.

Bharat Jadhav

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या 5 राज्यांमध्ये १ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होईल असा, इशारा हवामान खात्याकडून जारी करण्यात आलाय. हवामान विभागानुसार, महाराष्ट्रातील विदर्भ आणि तेलंगणामध्ये रेड अलर्ट आहे. आजपासून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाचा पट्टा आता मध्य भारताच्या दिशेकडे सरकत आहे. सध्याच्या घडीला गुजरात किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने पाऊस होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मध्य प्रदेश, मराठवाडा, आंध्र प्रदेश, कर्नाटकात यॅलो अलर्ट देण्यात आला असून या विविध भागात मुसळधार पाऊस पडणार.

मध्य प्रदेश, मराठवाडा, आंध्र प्रदेश, कर्नाटकात यॅलो अलर्ट देण्यात आला असून या विविध भागात मुसळधार पाऊस पडणार. शनिवारपासून पुढील चार ते पाच दिवस बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार,असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय. विदर्भ-मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पाऊस होईल. याशिवाय मुंबईसह उपनगरातही पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील काही भागात विजांसह पाऊस होईल असं सांगण्यात येत आहे.

विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय. तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल, हवामान विभागाने म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT