Weather Update May 2024 Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Maharashtra Rain Alert: येत्या २४ तासांत विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Satish Daud

Weather Update 6 May 2024

राज्यातील कमाल आणि किमान तापमानात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे. उन्हाचा तडाखा बसत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झालं आहे. उकाड्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. अशातच उन्हाच्या झळापासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कारण, भारतीय हवामान खात्याने राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. येत्या २४ तासांत विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होऊ शकते, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 kmph) वाहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

राज्यात कुठे कुठे कोसळणार पाऊस?

विदर्भ आणि मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया व यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. धाराशिव मध्ये आजपासून पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह हलका पाऊस होऊ शकतो.

मुंबईतील तापमानात वाढ

दुसरीकडे मुंबईसह उपनगरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रायगडसह रत्नागिरी, सांगली, सोलापूरमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमान वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ कार्य हातून घडणार; ५ राशींच्या लोकांना होणार धनलाभ

Maharashtra Live News Update: वसुबारसच्या निमित्ताने रायगडमध्ये गाय आणि वासराच्या पुजनाला माहिलांची गर्दी

Gajanan Vada Pav Dombivli : चाललंय काय? प्रसिद्ध वडपावच्या दुकानात चटणीत आढळल्या अळ्या; ग्राहकांचा संताप

विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवून गेला, छगन भुजबळांचा विखे पटलांवर हल्लाबोल|VIDEO

मध्यमवर्गीयांना हक्काचं घर मिळणार, मोदी सरकारची सर्वसामान्यांना दिवाळीची भेट

SCROLL FOR NEXT