Rain News Today in Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट; कुठे कुठे कोसळणार पाऊस? वाचा वेदर रिपोर्ट

Satish Daud

अरबी समुद्रात सौराष्ट्रालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याने दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळे आजपासून पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कामे उरकून घ्यावी तसेच शेतीकामांना जोर द्यावा, असं आवाहन देखील करण्यात आलंय. जून महिन्यात संपूर्ण राज्याकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात जोरदार हजेरी लावली. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

त्यामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहिले. परिणामी पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला. मात्र, अद्यापही राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाची शक्यता आहे. आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील विविध भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा?

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज शुक्रवारी कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे.

मराठवाडा विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा ‘यलो अलर्ट’ आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stree 2 OTT Release : सरकटेची दहशत आता घरबसल्या अनुभवा, OTT वर कधी रिलीज होणार 'स्त्री 2'?

Maharashtra News Live Updates: माझं चुकलतरी काय..? अजित पवारांच्या नेत्याचं पत्र व्हायरल

IND vs BAN : बांगलादेशाने जिंकला टॉस, भारत करणार फलंदाजी; चेन्नईचं पीच कोणाला ठरणार फायदेशीर?

Government Jobs: सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी कामाची बातमी, NIACL कंपनीत ३२५ पदांसाठी भरती; जाणून घ्या

Sangli News: शरद पवार- नितीन गडकरी एकाच मंचावर येणार; सांगलीमधील कार्यक्रमाचे संजयकाका पाटील यांच्याकडून निमंत्रण

SCROLL FOR NEXT