Maharashtra Weather Update Today Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert : विदर्भ-मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस; हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Rain Alert : भारतीय हवामान खात्याने आज विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Satish Daud

मागील आठवडाभरापासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. काही ठिकाणी पावसाच्या सरी तर काही भागात उन्हाचा कडाका जाणवतो आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात चांगलाच उकाडा वाढला आहे. अशातच हवामान खात्याने आज राज्यात वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकताना आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात मोठे बदल होणार असून काही भागात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.

आज शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्या देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील वाशीम, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात पाऊस पडणार आहे.

दरम्यान, सध्या काही भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतो आहे. शुक्रवारी (ता. १८) ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३७.३ अंश तापमानाची नोंद झाली. तर अकोला, चंद्रपूर, अमरावती येथे ३५ अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले आहे. पुढील आठवडाभर राज्यात हवामानाची अशीच स्थिती राहिल, असं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT