Maharashtra Weather Update Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast: महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस अन् गारपिटीची शक्यता; वाचा संपूर्ण वेदर रिपोर्ट

Weather Update Today: भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजनुसार, आजपासून (ता. १९) पुढील दोन ते तीन दिवस विदर्भासह खान्देशात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे.

Satish Daud

Maharashtra Weather Update 19 March 2024

सध्या वायव्य राजस्थानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे उत्तरेतील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होत असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील २४ तासांत पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजनुसार, आजपासून (ता. १९) पुढील दोन ते तीन दिवस विदर्भासह खान्देशात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

एकीकडे राज्यात कडक उन्हाळा सुरू झाला असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रासह (Maharashtra) विदर्भातील काही जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा चाळीशीपुढे गेलाय. मात्र, उत्तरेतील हवामान बदलांचा विदर्भ व खान्देशात मोठा प्रभाव दिसून येत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या (Heavy Rain) सरी कोसळत आहे. हवामान खात्याने मंगळवारी आणि बुधवारी देखील या भागात वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

देशातील हवामानाबाबत बोलायचं झाल्यास, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशा, बिहारमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

SCROLL FOR NEXT