Maharashtra Rain News Today 10th July 2024 Saam TV
महाराष्ट्र

Heavy Rain Alert : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस; विदर्भ-मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Rain News Today 10th July 2024 : आज बुधवारी आणि उद्या गुरुवारी मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्हांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

Satish Daud

मागील आठवडाभरापासून गुजरातसह केरळच्या किनारपट्टीवर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता अरबी समुद्रात गेला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा काहीसा जोर कमी झाला आहे. मात्र, आज बुधवारी आणि उद्या गुरुवारी मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्हांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

हवामान विभागाने (IMD Weather Update) दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यात आज चांगला पाऊस होईल. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती नागपूरसह चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगरसह, नंदुबार जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची (Heavy Rainfall Alert) शक्यता आहे. कोकणातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात अधून मधून हलका पाऊस पडू शकतो.

अगदी दोन दिवसांपूर्वी मुंबई महानगरात मुसळधार पाऊस (Mumbai Rain News) झाला होता. या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. रेल्वे रुळावर पावसाचं पाणी साचल्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.

दरम्यान, सोमवार दिवसभर आणि मंगळवारी दुपारनंतर मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे. आता बुधवार आणि गुरुवारी मुंबईत अधून मधून पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT