Rain News Maharashtra Marathi Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast : राज्यात पुढील ७२ तास मुसळधार पावसाचे; कोणकोणत्या जिल्ह्यांना झोडपणार पाऊस? वाचा वेदर रिपोर्ट

Rain Alert in Maharashtra : भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील ७२ तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वाचा संपूर्ण वेदर रिपोर्ट

Satish Daud

दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात पावसाचा जोर कायम राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. पुढील ७२ तास राज्यासाठी तुफानी पावसाचे असतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

सध्या पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानात मोठा बदल झाला असून ढगाळ वातावरण निर्माण झालंय. आगामी ७२ तासांत मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच ठाणे व पालघरमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत पावसाचा जोर वाढेल, असे कुलाबा वेधशाळेने सांगितले आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात मान्सूनचे वेळेआधीच आगमन झाले होते. पण जून महिन्यात वरुण राजाचे हवी तसी हजेरी लावली नव्हती. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवड्यात सर्वत्र पाऊसच पाऊस (Rain Updates) असणार आहे. मागील २४ तासांतच अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला.

मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाड्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. हवामान विभागाने आजपासून ३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, १ जुलै दरम्यान मुंबई, ठाणे रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग आणि २ जुलैला पुण्यातील घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याची (Rain Alert) शक्यता आहे.

विदर्भ तसेच मराठवाड्यातही वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांतही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT