Weather Forecast Today 10 February 2024  Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast: महाराष्ट्रात पुढील ३ दिवस अवकाळी पाऊस कोसळणार; 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून अलर्ट

IMD Rainfall Alert: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशासह राज्यातील काही भागात शुक्रवारी आणि शनिवारी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

Satish Daud

Maharashtra Rain Alert

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशासह राज्यातील काही भागात शुक्रवारी आणि शनिवारी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यासोबतच तापमानात वाढ होऊन थंडीचा कडाका कमी होईल, असंही आयएमडीकडून सांगण्यात आलंय. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरू होताच देशासह राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होऊ लागला आहे. नागरिकांना पहाटे कडाक्याची थंडी आणि दिवसभर उन्हाच्या झळा जाणवत आहेत. आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.(Latest Marathi News)

हवामान खात्याचे म्हणणे आहे की, १० ते १३ फेब्रुवारी दरम्यान मध्य भारतासह पूर्व भारतातील तापमानात वाढ होईल. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील. आजपासून दोन ते तीन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज (Rain Alert) वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कुठे-कुठे पडणार पाऊस?

पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख. डॉ. के. एस होसाळीकर यांनी ट्वीट करत राज्यातील पावसाचा अंदाज वर्तवणारी माहिती शेअर केली आहे. होसळीकर यांच्या माहितीनुसार, राज्यातील जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

याशिवाय विदर्भातील काही भागात देखील हलक्या स्वरुपाचाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शनिवारी गडगडाटी वादळांवर सोबत विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोबत वादळी वारे वेग 30-40 किमी प्रति तास जालना , हिंगोली आणि परभणी जिल्हे येथे घडण्याची शक्यता, असं होसळीकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

Nirmiti Sawant : निर्मिती सावंत यांचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; डॅशिंग लूकनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Viral Video: बाईक स्टंटचा प्रयत्न जीवावर बेतला, तोंडावर आपटल्याने तरुण जखमी; VIDEO

Morning Health Tips: सकाळच्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरतात वरदान

SCROLL FOR NEXT