Sharad Pawar Speech Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar Speech: 'पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे', फलटणच्या सभेत शरद पवार यांचं रोखठोक भाषण

Maharashtra Politics : आज फलटणमध्ये रामराजे निंबाळकर यांचे बंधू आणि पुत्राने शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी शरद पवार यांनी रोखठोक भाषण केलं आहे.

Satish Kengar

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

''पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे'', असं शरद पवार म्हणाले आहेत. आज फलटण येथे शरद पवार गटाचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत निंबाळकर यांनी शरद पवार प्रवेश केला. याच कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, ''मी आठवत होतो, ४ ते ६ महिन्यांपूर्वी मी फलटणमध्ये आलो होतो. पण त्यावेळी ज्या भेटी झाल्या त्याच्या आजच्या भेटीमध्ये फरक जाणवला. काहीतरी चुकलं का काय, असं जाणवत होतं.''

'पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे'

ते म्हणाले, ''मी देशात अनेक ठिकाणी भाषणं करतो, त्यामुळे मला लोकं कळतात. मला तुमचं डोळे आणि मन कळतं, आज तुमचे डोळे प्रफुल्लित आहेत. आज बारामतीचे चित्र वेगळं दिसत आहे. आज पलीकडे जे कारखाने उभे राहिले आहेत, त्याचा पाया निंबाळकर यांनी उभा केला. जे झालं, ते झालं. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे.''

आता दुसरी लढाई आहे, महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा?

पवार म्हणाले, ''आपण भाग्यवान आहोत की, यशवंतराव यांच्या सारखा नेता आपल्या राज्याला मिळाला. यशवंतराव मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी इंदिरा गांधी यांची समजूत घातली. फलटणचे योगदान कोणी विसरू शकत नाही. कारण तेव्हा जो करार झाला, तो इथे झाला. तुम्ही चिंता करू नका. त्यांची मानसिकता काय आहे, हे धैर्यशील याच्या निवडणुकीच्या वेळी बघितलं. धैर्यशील याला निवडून दिलं, त्याचं मी आभार मानतो. आता दुसरी लढाई आहे, महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा? सामान्य हातात द्यायचा का कोणाच्या हातात द्यायचा''

'तेव्हा तुम्हाला बहिण आठवली'

लाडकी बहीण योजेनवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत शरद पवार म्हणाले की, ''आता अनेक योजना आल्या आहेत. बहिणीचा सन्मान करणे सगळ्यांना आवडतं. फडणवीस यांचा हातात जेव्हा राज्य होतं, तेव्हा बहिण दिसली नाही. बहिण लोकसभेला दिसली. लोकसभेत जेव्हा ३१ जागा आम्ही जिंकल्या, तेव्हा तुम्हाला बहिण आठवली.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT