Parbhani Shivsena News
Parbhani Shivsena News Saam Tv
महाराष्ट्र

आम्ही उद्धव ठाकरेंना सोडणार नाही; शेकडो शिवसैनिकांनी बॉण्ड पेपरवर दिले वचनपत्र

साम टिव्ही ब्युरो

राजेश काटकर, साम टिव्ही

परभणी : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत (ShivSena) उभी फूट पडल्याचं चित्र आहे. सुरूवातीला आमदार, त्यानंतर खासदार आणि आता थेट नगरसेवक तसेच पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. दरम्यान, एकीकडे शिवसेनेचे नेते शिंदे यांच्या गटात सामिल होत असतांना, पाथरी तालुक्यातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शंभर रुपयाच्या बॉण्ड पेपरवर शिवसेनेला न सोडण्याचे वचनपत्रच दिले आहे. (Parbhani Shivsena News)

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल घडत आहेत राज्यभरात शिवसेनेचे नेते पक्ष सोडत असताना परभणी जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह पदाधिकारी मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले आहे. आज पाथरी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व जुन्या शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भविष्यातही आम्ही आपल्यासोबत राहू असे वचनपत्रच दिले आहे.

विशेष म्हणजे हे वचनपत्र शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपरवर देण्यात आले आहे. 'शिवसेना पक्षाच्या घटनेवर आमची पूर्णपणे निष्ठा असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्वाचे आम्ही पालन करू, तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पूर्ण निष्ठा असल्याचे नमूद केले या वचनपत्रात नमूद केलं आहे. (Uddhav Thackeray Latest News)

परभणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, शहरप्रमुख राहुल पाटील, माजी जिल्हापरिषद पंचायत समिती सदस्य,माजी नगरसेवक,सर्कल प्रमुख, उपसर्कल प्रमुख यांच्यासह शेकडो जुन्या शिवसैनिकांनी चक्क शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपर वर हे वचनपत्र लिहून दिलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Federation Cup: ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राचा धमाका, फेडरेशन कपमध्ये जिंकलं सुवर्णपदक

Maharashtra Politics: प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

Suzuki Jimny चा नवीन 5 डोअर एडिशन लॉन्च, मिळत आहे 1.50 लाखांपर्यंत सूट

Lok Sabha Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचारसभा?

Khatron Ke Khiladi 14: 'खतरों के खिलाडी १४'मध्ये कोण- कोण सेलिब्रिटी दिसणार? पाहा लिस्ट...

SCROLL FOR NEXT