Chhagan Bhujbal On OBC Reservation Saam TV
महाराष्ट्र

...आम्ही १०० टक्के खुश नाही; ओबीसी आरक्षणाबाबत छगन भुजबळ पंतप्रधानांकडे करणार 'ही' मागणी

Chhagan Bhujbal On OBC Reservation : आम्ही ओबीसी आरक्षणाबाबत शंभर टक्के खुश नाही असं म्हणत आरक्षण वाढवण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याची माहिती आमदार छगन भुजबळ यांनी दिली आहे

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक : सुप्रीम कोर्टाने ओबीसी समाजाला मोठा दिलासा दिला आहे. ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यात बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणूक घेऊन उर्वरित निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करा,असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार घ्या, असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) सुप्रीम कोर्टाच्या ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही ओबीसी आरक्षणाबाबत शंभर टक्के खुश नाही असं म्हणत आरक्षण वाढवण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याची माहिती आमदार छगन भुजबळ यांनी दिली आहे. महत्वाचं म्हणजे ओबीसींना देशव्यापी २७ टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Modi) करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नाशकात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. (Chhagan Bhujbal Latest News)

हे देखील पाहा -

आपल्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ म्हणाले की, आमचा लढा हा दोन-अडीच वर्षांचा नाही. मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेनेतून बाहेर पडलो आणि ९१ साली समता परिषदेची स्थापना झाली तेव्हापासून आमचा ओबीसींसाठी लढा सुरू आहे. मंडल आयोगाचे स्वागत केल्यामुळेच शिवसेनेत आमची खडाखडी सुरू झाली आणि त्यानंतर शिवसेना सोडली असं मोठं वक्तव्य भुजबळांनी केलं. तसेच सिन्नरमध्ये सरपंच आणि उपसरपंच ओबीसी असतानाही तिथे शून्य ओबीसी दाखवले असा दावाही त्यांनी केला आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत यावेळी भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले. ते म्हणाले, आम्ही (महाविकास आघाडीने) ओबीसी आरक्षणाचं काम पूर्ण केलं. शिंदे, फडणवीस सरकारने ते पुढे नेलं. मात्र, आम्ही १०० टक्के खुश नाही. ज्याठिकाणी कमी डाटा दाखवलाय, तिथे राज्यसरकारने त्याची शहानिशा करावी. सोबतच ओबीसींचे आरक्षण वाढवण्याची आणि आकडे बदलण्याचीही मागणी ते राज्यसरकारकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महत्वाचं म्हणजे ओबीसींना देशव्यापी २७ टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Modi) करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, यापुढेही आमचं काम सुरूच राहणार. येत्या जनगणनेत ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, अशी मागणी करणार. कोरोना काळात आम्ही ओबीसी-ओबीसी करत बसलो असतो तर लोकांनी आम्हाला वेड्यात काढल असतं असं भुजबळ म्हणाले, सोबतच ओबीसी आरक्षणाबाबत फडणवीसांनी आम्हाला सहकार्य केलं असं म्हणात त्यांनी फडणवीसांचे आभार मानले. त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षणाचे श्रेय सर्वांचे असून यात महाविकास आघाडी, भाजप आणि अन्य पक्षांचेही, जे-जे रस्त्यावर उतरले त्या सर्वांचे श्रेय आहे असंही भुजबळ म्हणाले आहेत. बाठिया आयोगातील त्रुटी दूर करणं हे आता आमचं पुढचं काम आहे असं भुजबळ म्हणाले आहेत.

शिंदे सरकारवर टिका

शिंदे सरकारबाबत भुजबळांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. भुजबळ म्हणाले की मुन्नाभाईमध्ये जसा संजय दत्त म्हणतो, केमिकल लोचा झालाय तसा या केसमध्ये कानूनी लोचा तयार झालाय. विधिमंडळ नेता कुणी निवडायचा? आमदारांनी की पक्ष प्रमुखाने? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. मैदानातील लढाई अजून पुढे आहे, मात्र कायद्याच्या लढाईत काय होईल हे सांगता येणं कठीण आहे असं भुजबळ म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT